Ashneer Grover Ishan Sharma Podcast: अशनीर ग्रोवर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही महिन्यांपूर्वी भारत पे कंपनी व्यवस्थापनाशी झालेल्या वादामुळे ते चर्चेत आले होते. पण आता एका पॉडकास्टमधील चर्चेमुळे अशनीर ग्रोवर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. Shark Tank मध्ये अशनीर ग्रोवर अनेक नवउद्योजकांचं सादरीकरण पाहून त्यांच्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करतात. पण या पॉडकास्टमधील अवघ्या २२ वर्षांच्या इशान शर्मानं खुद्द अशनीर ग्रोवर यांनाही धक्का दिला आहे.

इशान शर्माच्या यूट्यूब चॅनलवरील पॉडकास्टमध्ये अशनीर ग्रोवर यांच्यासह आशीष मोहपात्रा, सार्थक अहुजा व संजीव बिकचंदानी हे दिग्गज व्यावसायिक बसले होते. या चौघांची मुलाखत इशान शर्मा घेत होता. यावेळी अशनीर ग्रोवर यांच्याकडे व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन करण्यासंदर्भात त्यानं विचारणा केली असता ग्रोवर यांनाच धक्का बसला. कारण इशाननं त्याचं गेल्या महिन्यातलं उत्पन्न सांगितलं होतं ३५ लाख रुपये!

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Transfer of Rs 1500 aid under Ladki Bahin scheme resumes in Maharashtra
Ladki Bahin scheme : ६७ लाख ‘लाडक्या बहिणीं’ च्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा
akshay kelkar girlfriend sadhana kakatkar
१० वर्षे नातं ठेवलं गुपित; अखेर दिली प्रेमाची कबुली! अक्षय केळकरची ‘रमा’ आहे तरी कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “त्याने वचन…”
Aishwarya Narkar
मालिका संपल्यानंतर कोकणात पोहोचल्या ऐश्वर्या नारकर, चुलीवर केला स्वयंपाक; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या..
ek thali ek thaili rss
महाकुंभ २०२५! ‘एक थाळी एक थैली’ आणि ‘ समयदानी ‘ उपक्रम
Video : पॅकअप होताच मृणाल ठाकूरचा आनंद गगनात मावेना, ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘पीलिंग्स’ गाण्यावर रील करत केली धमाल

Video: २२ वर्षीय तरुणाची महिन्याची कमाई ऐकून अशनीर ग्रोवर यांना धक्काच बसला; म्हणाले, “तू आमच्या जागी बसायला हवं”!

अशनीर ग्रोवर म्हणाले, “तू आमच्या जागी बसायला हवं”

इशाननं एका प्रश्नाची पार्श्वभूमी देताना त्याच्या उत्पन्नाचा उल्लेख केला. “गेल्या महिन्यात मी ३५ लाख रुपये कमावले. पण मला ही एक समस्या वाटतेय. मी हा छोटा नफा कमावतोय. पण त्याकडे बघून बाहेर जाऊन मोठा व्यवसाय करण्याची इच्छा होत नाहीये. मी त्यात अडकलोय. यावर तुमचं काय म्हणणं आहे अशनीर?” असा प्रश्न विचारला असता अशनीर ग्रोवर यांनी आश्चर्यचकित होत “तू महिन्याला ३५ लाख रुपये कमावतोस? मग तर तू आमच्याजागी बसायला हवंस आणि आम्ही तुझी मुलाखत घ्यायला हवी”, अशी मिश्किल टिप्पणी करताच तिथे हास्याची लकेर उमटली!

इथे पाहा अशनीर ग्रोवर व इशान यांचा Viral Video!

कोण आहे इशान शर्मा?

ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इशान चर्चेत आला आहे. इशान BITS Pilani येथे शिक्षण घेत होता. पण काही कारणास्तव तिथून तो ड्रॉपआऊट झाला. त्यानंतर त्यानं त्याचा महाविद्यालयीन मित्र सारांश आनंदसोबत MarkitUp ही मार्केटिंग एजन्सी सुरू केली. याशिवाय इशान शर्मानं त्याचं यूट्यूब चॅनलही सुरू केलं. सोशल मीडियावर इशान शर्माचे जवळपास २० लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. इशान शर्मा प्रामुख्याने करीअर, फ्रीलान्सिंग आणि व्यवसायासंदर्भात त्याच्या सोशल मीडियावर माहिती देत असतो.

Story img Loader