लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी मुंबई: म्युच्युअल फंड उद्योगात वेगाने वाढत असलेल्या गुंतवणुकीचा ओघ पाहता, वितरकांच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या या उद्योगात येत्या पाच वर्षांत ५० हजार वितरकांची नव्याने भर घालण्याचे तंत्रज्ञानाधारित वित्तसंस्था ‘ॲसेटप्लस’चे नियोजन आहे. कंपनीकडे सध्या फंड उत्पादनांची विक्री करणारे १० हजार वितरक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘बीसीसीआय’च्या दिवाळखोरी दाव्याला आव्हान देण्याची ‘बैजूज’ची तयारी

‘ॲसेटप्लस’ ही सुमारे ३,००० कोटी रुपयांची मालमत्ता व्यवस्थापित करणारी देशातील वित्तीय उत्पादनांच्या वितरणातील आघाडीची कंपनी आहे. यामध्ये मासिक ५० कोटी रुपयांची ‘एसआयपी’ गुंतवणूक समाविष्ट आहे. कंपनीचे मुख्याधिकारी विश्रांत सुरेश यांनी माहिती दिल्याप्रमाणे, त्यांनी विकसित केलेले पूर्णपणे डिजिटल तंत्र-व्यासपीठ हे म्युच्युअल फंड वितरक आणि ग्राहक संबंध मजबूत करण्यास आणि त्यांची मालमत्ता वाढविण्यास मदतकारक ठरते.

हेही वाचा >>> बँक ठेवींवर आता ७.३५ टक्क्यांपर्यंत लाभ ! विविध बँकांकडून अतिरिक्त व्याजदराच्या विशेष योजना

म्युच्युअल फंड वितरकांना सर्वसमावेशक तंत्रज्ञान आणि व्यवसाय विकासाचे उपाय प्रदान करून मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात ‘ॲसेटप्लस’ लक्षणीय प्रगती करत आहे. कंपनीचा ठाम विश्वास आहे की, वितरक हे म्युच्युअल फंड उद्योगाचा कणा आहेत. ते सुजाणता, कौशल्य आणि वैयक्तिकीकृत सेवा प्रदान करून ग्राहकांना दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदतकारक ठरतात. अलीकडेच मे महिन्यात, ‘ॲसेटप्लस’ने इनक्रेडचे संस्थापक भूपिंदर सिंग आणि झीरोधाचे मुख्याधिकारी नितीन कामथ यांच्या नेतृत्वाखालील गुंतवणूकदारांकडून ३६ लाख डॉलरचा निधी उभारला आहे. ज्याचा विनियोग वितरक भागीदारांचे जाळे विस्तारण्यासाठी कंपनीकडून केला जाणार आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assetplus aims to enrol 50000 additional mutual fund distributors print eco news zws