देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC बँक आणि तिच्या बोर्डाने अतनु चक्रवर्ती यांना गैर कार्यकारी अध्यक्ष राहण्यासाठी तीन वर्षांची मुदतवाढीला मंजुरी दिली आहे. या संदर्भात बँकेने चक्रवर्ती यांचा दुसरा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढवून त्यांची स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्याची शिफारस रिझर्व्ह बँकेकडे केली होती. आता ते ५ मे २०२४ ते ४ मे २०२७ पर्यंत HDFC बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
ही पुनर्नियुक्ती आरबीआय आणि बँकेच्या भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन राहणार आहे, असे बँकेच्या फायलिंगमध्ये नमूद करण्यात आले होते. अतनु चक्रवर्ती यांची मे २०२१ मध्ये बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
हेही वाचाः चांगली बातमी! मोदी सरकार २५ रुपये किलोने तांदूळ विकणार, पीठ अन् डाळीनंतर तांदूळ भारतात येणार
अतनु चक्रवर्ती हे १९८५ च्या बॅचचे गुजरात केडरचे IAS अधिकारी होते. ते एप्रिल २०२० मध्ये आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव म्हणून निवृत्त झाले. यापूर्वी ते गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव होते. हे दोन्ही विभाग अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येतात.