केंद्र सरकारची नाविन्यपूर्ण रोजगार प्रोत्साहन योजना म्हणजेच आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेने (ABRY) आपले रोजगार निर्मितीचे प्रारंभिक उद्दिष्ट पार केले आहे. कोविड-19 महामारीच्या काळात रोजगार निर्मिती आणि पुनर्प्राप्ती करण्यात या योजनेने मोठे यश मिळवले होते.

ही योजना १ ऑक्टोबर २०२० पासून लागू करण्यात आली होती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये नोंदणीकृत असलेल्या आस्थापनांचे नियोक्ते आर्थिक सहाय्य देऊन नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (ABRY) ची रचना करण्यात आली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे १००० पर्यंत कर्मचारी संख्या असलेल्या आस्थापनांसाठी कर्मचारी आणि नियोक्ता योगदान (मजुरीच्या २४%) समाविष्ट करून महामारीच्या काळात नोकऱ्या गमावलेल्या लोकांसह बेरोजगार व्यक्तींना रोजगारासाठी प्रोत्साहन देणे आहे. त्याचबरोबर १००० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनांसाठी नवीन कर्मचार्‍यांच्या संदर्भात केवळ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी मधील (EPF) योगदान (मजुरीच्या १२%) समाविष्ट केले गेले.

Niv Recruitment 2024 Notification National Institute Of Virology Jobs 31 Vacancies Trade Apprentice Apply Now pune job
पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी’ संस्थेत विविध पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज जाणून घ्या
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
unemployment in Maharashtra
महाराष्ट्रातील बेकारी आणि रोजगार व्हाउचर
Pune Municipal Corporation has taken important decision for success of river improvement scheme
नदी सुधार योजनेच्या यशासाठी महापालिकेने घेतला मोठा निर्णय, अतिरिक्त आयुक्तांच्या बैठकीत निर्णय
Assembly Election 2024 political leaders who first become Mayor of Pune and then elected as MLA MP
महापौर ते… आमदार, खासदार!
salary
दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा; वित्त विभागाची मान्यता
Government jobs for youth due to this library initiative in Nandurbar
काय म्हणता? वाचनातून रोजगार मिळवता येतो?
Former BJP corporator Dinkar Patil vowed to contest assembly elections despite partys decision
पहिली बाजू : राष्ट्रहित, शेतकरीहित सर्वोपरी!

हेही वाचाः गेल्या ९ वर्षांत MSME प्रशिक्षण केंद्रांनी १६ लाख युवकांना दिले प्रशिक्षण, ३ लाख एमएसएमई युनिट्सना मिळाला लाभ : केंद्रीय मंत्री नारायण राणे

३१ मार्च २०२२ पर्यंत नोंदणीसाठी खुल्या असलेल्या या योजनेने संपूर्ण भारतातील अंदाजे ७.१८ दशलक्ष कर्मचाऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. ३१ जुलै २०२३ पर्यंत आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेने (ABRY) याआधीच ७.५८ दशलक्ष नवीन कर्मचार्‍यांची नोंदणी पूर्ण केली आहे, ज्यामुळे या योजनेचे प्रारंभिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट दिलेल्या वेळेआधीच पार झाले आहे. आजपर्यंत एकूण १,५२,३८० आस्थापनांनी ६०,४४,१५५ नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून सर्व पात्रता अटी पूर्ण केल्यानंतर या आस्थापनांनी आत्मनिर्भर भारत रोजगार योजने (ABRY) अंतर्गत ९,६६९.८७ कोटी रुपयांचा लाभ प्राप्त केला आहे. या योजनेद्वारे लाभार्थी आस्थापना आणि कर्मचाऱ्यांना मासिक आधारावर विशिष्ट पात्रता निकषांनुसार लाभांचे वितरण सुनिश्चित केले जाते.

हेही वाचाः विश्लेषण : सिलिंडरपाठोपाठ मोदी सरकार आता पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्याच्या तयारीत?

महामारीच्या या आव्हानात्मक काळात आर्थिक पुनरुत्थानाला चालना देण्यासाठी या योजनेची भूमिका अधोरेखित करून रोजगार निर्मितीच्या पुनरुज्जीवनासाठी भरीव योगदानावर भर देण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेबद्दल (ABRY) अधिक माहितीसाठी https://www.epfindia.gov.in/site_en/abry.php या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.