दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेली गो फर्स्ट एअरलाइन्स पुन्हा उड्डाण भरण्याची योजना आखत आहे. परंतु एअरलाइन्ससमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. गो फर्स्ट उड्डाणे पुन्हा सुरू करण्यापूर्वी एअरलाइन्सला त्यांच्या तयारीचे ऑडिट करावे लागणार आहे, असेही विमान वाहतूक नियामक DGCA ने सांगितले आहे. त्यामुळेच आता गो फर्स्टचे टेन्शन वाढले आहे. गो फर्स्ट एअरलाइन या विमान कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया सुरू आहे. या कंपनीला पुन्हा विमान उड्डाणांची परवानगी देण्याआधी तिचे लेखापरीक्षण केले जाईल, अशी भूमिका नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने घेतली आहे. दिवाळखोर झालेल्या GoFirst ने ३ मेपासून उड्डाण करणे बंद केले आणि दिवाळखोरीसाठी अर्ज केला, ज्यासाठी कंपनीला NCLT नंतर NCLAT ने मंजुरी मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गो फर्स्टची नेमकी योजना काय?

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विमान कंपनीने DGCA च्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर दिले आहे. GoFirst लवकरात लवकर उड्डाण सेवा पुन्हा सुरू करण्याची योजना बनवत आहे. याबाबत कंपनीने कर्मचाऱ्यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय पुढील काही दिवासांत कंपनीचे लेखापरीक्षण करणार असून, आपली तयारी तपासणार आहे. महासंचालनालयाने मंजुरी दिल्यानंतर आपण पुन्हा एकदा विमाने उड्डाणे सुरू करू. सरकारने आपल्याला मदत करण्याची भूमिका घेतली असून, लवकरात लवकर उड्डाणे सुरू करण्यास सांगितले आहे.

कर्मचाऱ्यांना पगार मिळणार

गो फर्स्टच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन पुन्हा विमानांचे उड्डाण सुरू होण्याआधी दिले जाईल. याचबरोबर पुढील महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन दिले जाईल.

२६ मेपर्यंत सर्व उड्डाणे रद्द राहणार

या विमान कंपनीने २६ मेपर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलने सोमवारी त्यांच्या दिवाळखोरीच्या निराकरण प्रक्रियेसाठी GoFirst ची याचिका मान्य करण्याचा NCLTचा निर्णय कायम ठेवला.