आधार क्रमांक जारी करणारी नोडल संस्था असलेल्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)चे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नीलकंठ मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीलकंठ मिश्रा सध्या अ‍ॅक्सिस बँक लिमिटेडमध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि ग्लोबल रिसर्चचे प्रमुख आहेत. अ‍ॅक्सिस बँकेच्या आधी मिश्रा यांनी झुरिचस्थित क्रेडिट सुइसमध्ये दोन दशके काम केले. नीलकंठ मिश्रा धातू आणि खाणकाम, भारतीय फार्मास्युटिकल्स, तैवान आयसी डिझाइन, सेमीकंडक्टर फाउंड्रीज आणि आशियाई टेक स्ट्रॅटेजी संशोधन यात पारंगत आहेत. UIDAI बोर्डामध्ये एक अध्यक्ष, दोन अर्धवेळ सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधार हे इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या मेंदूची उपज असल्याचे म्हटले जाते. यामुळे भारतीयांना युनिक आयडेंटिटी प्रदान करण्यात क्रांती झाली आहे. देशातील गरजू नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या सर्व सरकारी आणि खासगी क्षेत्रातील योजनांसाठी आधार हे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. मात्र, सुरक्षितता आणि डेटा सुरक्षेशी संबंधित समस्यांनीही या प्रणालीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नीलकंठ मिश्रा हे तंत्रज्ञान आणि आर्थिक धोरण या दोन्ही गोष्टींचे जाणकार आहेत. त्यामुळेच UIDAI चे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नीलकंठ मिश्रा यांच्या नियुक्ती झाल्याने एजन्सीला प्रक्रिया आणखी मजबूत करण्यास मदत मिळणार आहे.

हेही वाचाः अदाणी समूहासाठी अच्छे दिन, प्रवर्तक समूहाने अदाणी एंटरप्रायझेसमधील हिस्सा वाढवला, गुंतवणूकदारांना किती फायदा?

नीलकंठ मिश्रा हे आर्थिक धोरण आणि बाजाराच्या धोरणाबाबत त्यांच्या वेगळ्या दृष्टिकोनासाठी ओळखले जातात. याआधी ते अनेक सरकारी समित्यांचे सल्लागार राहिले आहेत. ते १५ व्या वित्त आयोगाच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्यही राहिले आहेत. सरकारी धोरणांबद्दलची त्यांची मते वर्तमानपत्रांतून आणि ऑनलाइन प्रकाशनांतून त्यांच्या नियमित लेखांतून प्रसिद्ध होत असतात. नीलकंठ मिश्रा हे सरकारच्या उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनांचे जोरदार समर्थक आहेत. या योजनेमुळे उत्पादनाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचाः बिल गेट्स यांना भारताची डिजिटल प्रणाली आवडली अन् जगाला कुसुमची ओळख करून दिली; कोण आहे कुसुम?

IIT-कानपूरमधील संगणक शास्त्रातील सुवर्णपदक विजेते नीलकंठ मिश्रा यांचा विश्वास आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीच्या काळात भारताचा डिजिटल पराक्रम विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. मिश्रा अनेकदा तंत्रज्ञानातील बदलांचे फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टींवर प्रकाश टाकतात, ज्यामुळे व्यवसाय करणे सुलभ होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Axis bank neelkanth mishra appointed as part time chairman of uidai vrd
Show comments