पुणे : आघाडीची दुचाकी वाहन निर्माता बजाज ऑटो लिमिटेडने विद्युत शक्तीवर धावणारी चेतक-३५ श्रेणी दाखल केली आहे. या श्रेणीमध्ये तीन प्रकारात दुचाकी उपलब्ध करण्यात आली. हे वाहन नवीन फ्लोअरबोर्ड बॅटरी, नवीनतम तंत्रज्ञान आणि अतिरिक्त सुरक्षा पर्यायांनी सुसज्ज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून अमीट छाप

दुचाकी एकदा चार्ज केल्यानंतर ती १५३ किमी धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे. शिवाय सुमारे ८० टक्के चार्जिंग हे केवळ एका तासात शक्य होणार आहे. नवीन फ्लोअरबोर्ड बॅटरीजमुळे ३५ लिटरची अंडरसीट सामानासाठी जागा देखील उपलब्ध झाली आहे. यामुळे वाहन चालवणाऱ्याला लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक सामान नेणे शक्य होणार आहे. याबरोबच स्मार्ट टचस्क्रीन, म्युझिक कंट्रोल, डॉक्युमेंट स्टोरेज आणि कॉल हँडलिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> चालू खात्यावरील तूट जीडीपीच्या तुलनेत १.२ टक्क्यांवर

चेतक ३५ मालिकेच्या सादरीकरणाने दुचाकी बाजारात बजाज ऑटो आघाडी घेणार असून तरुण वर्गाला आकर्षित केले जाईल. नवीन दुचाकीत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि निओ-क्लासिक शैलीची सांगड घालण्यात आली आहे, असे बजाज ऑटोचे अर्बनाईट बिझनेस युनिटचे अध्यक्ष एरिक वास म्हणाले. चेतक ३५०१ ही दुचाकी डिसेंबरअखेरीस आणि ३५०२ चेतक जानेवारीत ग्राहकांच्या हाती मिळू शकणार आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj auto launches new chetak electric scooter print eco news zws