स्माईल ट्रेन, क्लेफ्ट केअरसाठी काम करणारी जगातील प्रमुख संस्था आणि बजाज फिनसर्व्ह, नावाजलेली वित्तीय सेवा कंपनीने आपल्या सहभागाने ‘महा स्माइल्स – क्लेफ्ट केयर फॉर एवरी चाइल्ड’ या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत, क्लेफ्ट प्रभावित (टाळू किंवा ओठावरील विसंगती) असलेल्या मुलांची चाचणी करून त्यांना वेळीच उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच याबाबत महाराष्ट्रात सर्वसमावेशक जागरूकता निर्माण करणे हे या नवीन सहकार्याचे उद्दिष्ट आहे.

बाल आरोग्य (Child Health) बजाज फिनसर्व्हच्या सीएसआर कार्यक्रमांमध्ये एक मुख्य क्षेत्र आहे, आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी स्माइल ट्रेनच्या सहाय्याने मागील ९ वर्षांत ६० हजार क्लेफ्ट सर्जरीजचे समर्थन केले आहे. हा नवीन प्रकल्प महाराष्ट्रतल्या क्लेफ्ट प्रभावित बालकांना ८ हजार सर्जरीद्वारे सर्वसमावेशक क्लेफ्ट केयर उपलब्ध करून देणार आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड

हेही वाचाः अ‍ॅमेझॉनमध्ये पुन्हा एकदा नोकर कपात; दिग्गज ई-कॉमर्स कंपनी आता ‘या’ विभागातील अनेकांना घरी बसवणार

भारतात दरवर्षी ३५ हजारांपेक्षा जास्त शिशू टाळू किंवा ओठावरील विसंगती घेऊन जन्माला येतात. त्यांपैकी अनेकांना अंधश्रद्धा, समाजात प्रचलित असलेल्या, गैरसमज किंवा आर्थिक अडचणींमुळे बहुतांश वेळा उपचार मिळत नाही. या समस्यांसाठी उपाय म्हणून या प्रकल्पाने दुहेरी मार्ग निवडले आहे. प्रथम हा क्लेफ्ट प्रभावित बालकांची ओळख करेल आणि स्माइल ट्रेनच्या हॉस्पिटलच्या नेटवर्कद्वारे त्यांना समयोग्य सर्जरीज पुरवेल. या उपक्रमाचा दुसरा भाग म्हणजे क्लेफ्ट विषयी जागरुकता वाढवणे आणि जन्मतः टाळू किंवा ओठावरील विसंगती संबंधित पालक आणि नागरिकांना शिक्षित करणे हा आहे. हे काम करण्यासाठी स्माइल ट्रेन बरोबर स्वास्थ्य सेवक, समाज सेवक, AMOGS (एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र ओब्स्टेट्रिक आणि जिनेकॉलॉजिकल सोसायटी) पीडियॅट्रिक असोसिएशन, आणि एनजीओ इत्यादींचा समावेश असेल.

हेही वाचाः Mumbai Builder Scam : फ्लॅट अवघे दोन अन् खरेदीदार १५०; मुंबईत बिल्डरचा घोटाळा अन् करोडोंचा लावला चुना

स्माईल ट्रेनच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालिका ममता कॅरोल यांनी जन्मतः या समस्येने त्रस्त असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी बजाज फिनसर्व्हने दाखविलेल्या समर्पित स्वारस्याबद्दल कंपनी आणि त्यांच्या व्यवस्थापनाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. “सातत्याने बालकांना क्लेफ्ट उपचार देणे हे स्माईल ट्रेनचे ध्येय आहे. टाळू किंवा ओठावरील विसंगती वैद्यकीय उपचाराच्या माध्यमातून दूर केली जाऊ शकते आणि अशी मुलं स्वस्थ जीवन जगू शकतात. या संदर्भात ‘महा स्माइल्स’च्या सहाय्याने समाजातील सर्व घटक सर्व वर्गांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या उद्देश्यात आहे. बजाज फिनसर्व्हसोबतची आमची भागीदारी अशा मुलांना निरोगी आणि पूर्ण आयुष्य सहज आणि सुखदपणे जगण्यास मदत करते.” मोफत आणि वेळेवर क्लेफ्ट केअरची सोय मिलवण्यासाठी क्लेफ्ट-ग्रस्त कुटुंबांनी ह्या स्माईल ट्रेनच्या टोल-फ्री- १८०० १०३ ८३०१ नंबर वर संपर्क साधावा. ही हेल्पलाइन गरजूंना परिपूर्ण माहिती उपलब्ध करून देईल.