मुंबई: बजाज समूहातील गृहवित्त कंपनी असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सने भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडे प्रारंभिक समभाग विक्रीतून (आयपीओ) ७,००० कोटी रुपयांचा निधी उभारणीसाठी मसुदा प्रस्ताव दाखल केला आहे. या माध्यमातून सुमारे ४,००० कोटी रुपयांचे नवीन समभाग तर पालक कंपनी असलेली बजाज फायनान्स आंशिक समभाग विक्रीच्या (ओएफएस) माध्यमातून सुमारे ३,००० कोटी मूल्याच्या समभागांची विक्री करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> अर्थसंकल्पापूर्वी व्यापारी आणि उद्योग वर्गाकडून सूचनांची मागणी

बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा उपयोग भविष्यातील व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भांडवली आधार वाढवण्यासाठी करण्याचा मानस आहे. तर ओएफएसच्या माध्यमातून मिळालेला निधी भागधारकांकडे जाईल. आयपीओपश्चात बजाज हाऊसिंग फायनान्सचा समभाग हा राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध केला जाईल.

गेल्या आठवड्यात ६ जून रोजी, बजाज फायनान्सच्या संचालक मंडळाने बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओमध्ये ३,००० कोटी रुपये मूल्याच्या समभाग विक्रीला मान्यता दिली. आयपीओसंबंधित समभागाचा किंमतपट्टा आणि इतर महत्त्वाच्या तारखा कंपनीकडून योग्य वेळी जाहीर केल्या जातील. बजाज हाऊसिंग फायनान्स पूर्णपणे बजाज फायनान्सच्या मालकीची उपकंपनी आहे आणि बजाज फायनान्समध्ये बजाज फिनसर्व्हचे ५१.३४ टक्के हिस्सेदारी आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स ही सप्टेंबर २०१५ पासून ठेवी न स्वीकारणारी गृह वित्त कंपनी म्हणूनच नोंदणीकृत आहे. ती निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदी आणि नूतनीकरणासाठी वित्तपुरवठा करते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कंपनीने १,७३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षातील १,२५८ कोटी रुपयांच्या तुलनेत तिच्या नफ्यात यंदा ३८ टक्के वाढ झाली आहे.