मुंबईः गुंतवणूकदारांकडून भरभरून प्रतिसादातून, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या बुधवारी समाप्त झालेल्या प्रारंभिक समभाग विक्रीने (आयपीओ) आजवरच्या सर्व विक्रमांना मोडीत काढले. ६,५६० कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित असलेल्या या ‘आयपीओ’ने गुंतवणूकदारांकडून तब्बल ३.२० लाख कोटी रुपयांच्या बोली मिळविल्या. आधीचा विक्रम गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या ३,००० कोटी रुपयांच्या ‘आयपीओ’साठी आलेल्या सुमारे दीड लाख कोटींच्या बोली असा होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘सॅमसंग इंडिया’चे कर्मचारी कपातीचे पाऊल

एकाच वेळी पाच कंपन्यांचे, त्यातही पीएनजी ज्वेलर्स, टॉलिन्स टायर्स सारख्या ‘आयपीओ’शी स्पर्धा असतानाही, बजाज हाऊसिंग फायनान्सच्या समभागांनी गुंतवणूकदारांकडून मिळविलेली दमदार मागणी लक्षणीय ठरते. अलिकडच्या काळातील सर्वाधिक ६७.४३ पट अधिक भरणा या ‘आयपीओ’मध्ये झाला. मुख्यत: गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २०० पटीने अधिक मागणी बजाज हाऊसिंग फायनान्सच्या समभागांनी नोंदवली. या तुलनेत किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून दाखल अर्जांची संख्या ७.०२ पट इतकी आहे. खुल्या विक्रीला सुरुवात होण्याआधी कंपनीने बड्या (अँकर) गुंतवणूकदारांकडून १,७५८ कोटी रुपये उभे केले आहेत.

हेही वाचा >>> रिझर्व्ह बँकेकडून ॲक्सिस, एचडीएफसी बँकेला दंड

प्रति समभाग ६६ रुपये ते ७० रुपये या किमतपट्ट्यावर बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या दंडकाचे पालन करण्यासाठी कंपनीकडून ही समभाग विक्री योजण्यात आली होती. आयएल ॲण्ड एफएस घोटाळा उघडकीस आल्यानंंतर, सप्टेंबर २०२२ मध्ये रिझर्व्ह बँकेने उच्च श्रेणीतील (अप्पर-लेअर) बँकेतर वित्तीय कंपन्यांची एक यादी जाहीर केली, त्या यादीत असलेल्या कंपन्यांना सप्टेंबर २०२५ पर्यंत त्यांचे समभाग बाजारात सूचीबद्ध करणे बंधनकारक केले गेले. आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर या गृहवित्त क्षेत्रातील कंपनीकडून भांडवली पाया मजबूत करण्यासाठी केला जाणार आहे.