म्युच्युअल फंड क्षेत्रात नव्याने पदार्पण केलेल्या बजाज फिनसर्व्ह एएमसीने ‘बजाज फिनसर्व्ह लिक्विड फंड’ आणि ‘बजाज फिनसर्व्ह ओव्हरनाइट फंड’ गुंतवणूकदारांसाठी खुला केल्याची गुरुवारी घोषणा केली. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने बजाज फिनसर्व्ह एएमसीच्या मान्यता दिलेल्या सात फंडांपैकी हे पहिले दोन मुदतमुक्त फंड आहेत. या दोन योजनांमधील गुंतवणूक गुरुवारपासून (२९ जून) येत्या ४ जुलैपर्यंत खुली असेल, त्यानंतर हे फंड बाजार ‘एनएव्ही’नुसार पुनर्गुंतवणुकीस खुले असतील.
हेही वाचाः विश्लेषण : उद्यापर्यंत पॅन अन् आधार लिंक केलं नाही तर काय दुष्परिणाम भोगावे लागणार?
बजाज फिनसर्व्हने मंजुरीसाठी दाखल केलेल्या सात फंड प्रस्तावात लिक्विड फंड, मनी मार्केट फंड, ओव्हरनाइट फंड, आर्बिट्राज फंड, लार्ज ॲण्ड मिड-कॅप फंड, बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड आणि फ्लेक्झी कॅप फंड यांचा समावेश आहे. अत्यंत कमी कालावधीसाठी इतरत्र कुठेही वापरता येऊ शकत नसलेला मोठा निधी अल्प मुदतीसाठी गुंतवता येण्यासाठी नव्याने दाखल लिक्विड फंड उपयुक्त असून, प्रामुख्याने तो संस्थामक गुंतवणूकदारांसाठी आहे.
हेही वाचाः भारतीयाने स्वित्झर्लंडमध्ये खरेदी केला १६४९ कोटींचा भव्य व्हिला, कोण आहेत पंकज ओसवाल?