अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पुन्हा एकदा भारताचे नाव आघाडीवर आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. चीनमध्येही मंदीचे ढग दाटून आले असताना अमेरिका आणि युरोपमधील मंदीची भीती अजून संपलेली नाही. चीनच्या रिअल इस्टेट संकटाचा परिणाम बँकिंग क्षेत्रावरही होऊ लागला आहे. दरम्यान, जगातील तीन मोठे देश मंदीच्या संकटाचा सामना करीत आहेत. त्याचबरोबर भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे.
जागतिक बँक आणि IMF सारख्या संस्थांच्या मते, २०२३ मध्येही भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. या वर्षी भारताची अर्थव्यवस्था ६.३ टक्क्यांच्या वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारताचा वेग सर्वाधिक असण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचाः PM किसान योजनेचा पुढील हप्ता ‘या’ महिन्यात येणार, अशा पद्धतीनं घ्या लाभ
यादीतील ‘या’ देशांची स्थिती कशी?
या यादीत दुसरे नाव बांगलादेशचे आहे, ज्याचा विकास दर ६ टक्के आहे. तिसरे नाव दक्षिण अमेरिकन देश कोलंबियाचे आहे. यंदा त्यांची अर्थव्यवस्था ५.६ टक्के वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. फिलिपिन्सची अर्थव्यवस्था ५.३ टक्के वेगाने वाढू शकते. आर्थिक आघाडीवर अनेक अडचणींचा सामना करत असलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेचा यंदा पाच टक्के वाढ अपेक्षित आहे. इंडोनेशियादेखील त्याच गतीने वाढू शकतो. युरोपचा आजारी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुर्कस्तानचा जीडीपी वाढीचा दर यंदा चार टक्के असू शकतो, तर यूएईचा विकास दर ३.४ टक्के, मेक्सिको ३.२ टक्के आणि ब्राझीलचा ३.१ टक्के असू शकतो.
हेही वाचाः वर्ल्डकप गमावला पण विक्रमी प्रेक्षकसंख्या कमावली; भारतात ४२२ अब्ज मिनिटे पाहिला गेला टीव्ही
अमेरिकेची अर्थव्यवस्थाही वाढू शकते
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानल्या जाणाऱ्या अमेरिकेची अर्थव्यवस्था यंदा २.१ टक्के वेगाने वाढू शकते, तर युक्रेनशी युद्धात अडकलेला रशिया २.२ टक्के वेगाने वाढू शकतो. जपानची जीडीपी वाढ २ टक्के, कॅनडाची १.३ टक्के, फ्रान्सची १ टक्के, सौदी अरेबियाची ०.८ टक्के, इटलीची ०.७ टक्के आणि यूकेची ०.५ टक्के वाढ अपेक्षित आहे. अर्जेंटिनाची परिस्थिती सर्वात वाईट असल्याचे दिसते. एकेकाळी जगातील विकसित देशांपैकी एक असलेल्या अर्जेंटिनाची अर्थव्यवस्था नकारात्मक २.५ टक्के वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे एस्टोनिया, स्वीडन, पाकिस्तान, जर्मनी, लिथुआनिया आणि फिनलंडमधील अर्थव्यवस्था नकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे. आर्थिक संकटाचा सामना करणार्या पाकिस्तानचा या वर्षी सकल राष्ट्रीय उत्पादन विकास दर नकारात्मक ०.५ टक्के राहण्याची अपेक्षा आहे.