दोन बांगलादेशी बँका भारतीय रुपयात व्यापार अन् व्यवहार सुरू करण्याची योजना आखत आहेत, कारण दक्षिण आशियाई राष्ट्र बांगलादेशचा परकीय चलन साठा वाढवू इच्छित आहे. त्यांना डॉलरवरील अवलंबित्व कमी करायचे आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ईस्टर्न बँक ११ जुलै रोजी रुपयामध्ये व्यापार करण्याची आपली योजना जाहीर करणार आहे. बँकेने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ICICI बँकेत रुपे खाते उघडले आहे. बांगलादेशातील आणखी एका सरकारी बँकेने सोनाली बँकेने असेच पाऊल उचलले आहे. या बँकांद्वारे भारतीय रुपयाचा वापर वाढवून डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या बांगलादेशचा प्लॅन आहे. स्थानिक आणि प्रादेशिक चलने वापरणे विकसनशील देशांना संकटाच्या वेळी परकीय चलन साठा वाचविण्यात मदत करू शकते, असंही तिथल्या सरकारला वाटते.

सीमापार व्यवहार करणे सोयीचे होणार?

अहवालानुसार, ईस्टर्न बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अली रझा इफ्तिखार यांनी गुरुवारी एका मुलाखतीत सांगितले की, “भारत-बांगलादेश व्यापारात भारतीय रुपयाचा वापर सीमापार व्यवहारांसाठी एक सोयीस्कर आणि किफायतशीर यंत्रणा म्हणून करणे फायदेशीर ठरणार आहे. यामुळे विनिमय खर्च कमी होणार असून, व्यवसाय करण्याची सुलभता वाढणार आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात बांगलादेशने चीननंतरचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार देश म्हणून भारताकडून जवळपास १४ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची आयात केली. या दरम्यान केवळ २ अब्ज डॉलरच्या वस्तू बांगलादेशातून भारतात निर्यात केल्या गेल्या. विशेषत: बांगलादेशची भारतातील आयात ही बँकांतर्गत व्यवहारातून वाढणे अपेक्षित आहे. “पहिल्या दिवशी व्यापार १५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, अशी माझी अपेक्षा नाही, परंतु आम्ही खूप नम्र आहोत,” असंही इफ्तिखार म्हणाले.

Why did the stock market fall before Diwali
Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
international market investment
मार्ग सुबत्तेचा : आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करताना….
maharashtra Mahayuti Govt schemes
Financial Burden on Maharashtra: मतदारांना आकर्षित करण्यासाठी २०० घोषणा; प्रतिवर्षी १ लाख कोटींचा बोजा; निवडणुकीसाठी महायुतीकडून राज्यावर बोजा?
sensex drops 663 point nifty ends below 24200
‘मुद्रा’ कर्जांची मर्यादा दुपटीने वाढून २० लाखांवर
mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भारतीय अर्थव्यवस्था – मूलभूत संकल्पना
unified pension scheme
Money Mantra: युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय? याचा फायदा कोणाला मिळणार आहे?
Gold Price Today
४५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सोन्याने दिला भरघोस परतावा; २०२४ मध्ये तब्बल ३२.५ टक्क्यांचा नफा

हेही वाचाः देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचे कर्ज महागले, EMI वाढणार

रुपे डेबिट कार्ड लॉन्च करण्याची योजना

बांगलादेशचा राखीव निधी ५ जुलैपर्यंत ३१.१६ अब्ज डॉलर एवढा खाली आला आहे, जो एका वर्षापूर्वी ४१.८८ अब्ज डॉलर होता. साठा स्थिर करण्यासाठी दक्षिण आशियाई देश अधिक बाजार निर्धारित विनिमय दराकडे वळला आहे. बांगलादेशच्या सेंट्रल बँकेने परकीय चलनाच्या घटत्या गंगाजळीमुळे डॉलर वाचवण्यासाठी सप्टेंबरमध्ये रुपे डेबिट कार्ड सुरू करण्याची योजना आखली आहे. बांगलादेशींना ट्रॅव्हल कोटा अंतर्गत भारतात प्रतिवर्ष १२,००० डॉलर इतका खर्च करण्याची परवानगी दिली जाईल. कार्ड सुरू केल्याने चलनाचे दुहेरी रूपांतर दूर होईल आणि नुकसान ६ टक्क्यांनी कमी होईल, असंही गव्हर्नर अब्दुर रुफ तालुकदार यांनी गेल्या महिन्यात सांगितले.

हेही वाचाः देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचे कर्ज महागले, EMI वाढणार