Bank Holiday In December 2024 : नोव्हेंबरनंतर आता डिसेंबर महिन्यातही बँकांच्या सुट्ट्यांची मोठी यादी आहे. या महिन्यात ख्रिसमस वगळता इतर कोणते सण नसले तरी अनेक विशेष दिवस आहेत, त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये १७ दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयने डिसेंबरमधील सुट्ट्यांचं कॅलेंडर प्रसिद्ध केलं आहे. या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक रविवार आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात तुमचे काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याचा विचार असेल तर आधी सुट्ट्यांची यादी तपासून घ्या.

डिसेंबरमध्ये देशभरातील बँका १७ दिवस बंद राहणार असल्या तरी वेगवेगळ्या राज्यांनुसार वेगवेगळ्या सुट्ट्या आहेत. आरबीआयने जाहीर केलेल्या सुट्टीच्या यादीतील काही सुट्ट्या राष्ट्रीय स्तराच्या आहेत. त्या दिवशी देशभरातील बँक बंद राहतील. तसेच काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तरावरील आहेत, त्यामुळे त्या दिवशी फक्त संबंधित राज्यांमध्येच बँका बंद असतील. त्यामुळे उत्तर प्रदेशात जेव्हा बँका बंद असतील तेव्हा महाराष्ट्रातील बँका बंद असतील, असा गैरसमज करून घेऊ नका.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी

चहा विकण्याची अशी अनोखी पद्धत कधी पाहिलीय का? VIDEO पाहून तुम्हीही व्हाल थक्क, युजर म्हणाले, “हिडन टॅलेंट..”

डिसेंबर २०२४ मध्ये ‘या’ दिवशी बँका राहणार बंद (Bank holidays in December 2024)

१ डिसेंबर २०२४ (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

३ डिसेंबर २०२४ (मंगळवार) – सेंट फ्रान्सिस झेवियरच्या सणानिमित्त गोव्यात बँका बंद राहतील.

८ डिसेंबर २०२४ (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

१२ डिसेंबर २०२४ (गुरुवार) – मेघालयमध्ये पो-टोगन नेंगमिंजा संगमामुळे बँका बंद.

१४ डिसेंबर २०२४ (शनिवार) : दुसरा शनिवार

१५ डिसेंबर २०२४ (रविवार) : साप्ताहिक सुट्टी

१८ डिसेंबर २०२४ (बुधवार) : गुरु घासीदास जयंतीनिमित्त चंदीगडमध्ये बँका बंद.

१९ डिसेंबर २०२४ (गुरुवार) : गोवा मुक्ती दिन (गोव्यात सर्व बँका बंद राहतील)

२२ डिसेंबर २०२४ (रविवार) : साप्ताहिक सुट्टी

२४ डिसेंबर २०२४ (मंगळवार) : गुरु तेग बहादूर यांचा हुतात्मा दिवस आणि नाताळच्या पूर्वसंध्येला मिझोराम, मेघालय, पंजाब चंदीगडमध्ये बँका बंद.

२५ डिसेंबर २०२४ (बुधवार) : ख्रिसमस सणानिमित्त सर्व राज्यांमध्ये बँका बंद.

२६ डिसेंबर २०२४ (गुरुवार) : ख्रिसमस सणानिमित्त काही राज्यांमध्ये बँका राहणार बंद.

२७ डिसेंबर २०२४ (गुरुवार) : ख्रिसमस सणानिमित्त काही राज्यांमध्ये बँका राहणार बंद.

२८ डिसेंबर २०२४ (शुक्रवार) : चौथा शनिवार

२९ डिसेंबर २०२४ (रविवार) : साप्ताहिक सुट्टी

३० डिसेंबर (सोमवार) : U Kiang Nangbah मेघालयमध्ये बँका बंद आहेत.

३१ डिसेंबर (मंगळवार) : न्यू इअरनिमित्त काही राज्यांतील बँका राहणार बंद.

तुम्ही ‘या’ ऑनलाइन सेवांची मदत घेऊ शकता

बँकांना सुट्ट्या असल्या तरी ग्राहक ऑनलाइन सेवांची मदत घेऊ शकतात. यात UPI, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांचा वापर करू शकता.