Bank Holiday January 2025 List : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्ष २०२५ चे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत. अनेक जण पार्टी आणि सुट्यांमध्ये फिरण्याच्या योजना आखत आहेत. तर दुसरीकडे काही जण आर्थिक नियोजन करण्यात गुंतले आहेत. दरम्यान, तुमचेही वर्षाच्या पहिल्याच जानेवारी महिन्यात बँकेसंबंधित काही महत्त्वाचे काम असेल, तर ते लवकर पूर्ण करून घ्या. कारण- जानेवारीत बँका जवळपास १५ दिवस बंद राहणार आहेत.

आरबीआयने जानेवारी २०२५ मधील सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या सुट्यांमध्ये साप्ताहिक रविवार आणि महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे जानेवारीत करण्याचा विचार करीत असाल, तर आधी सुट्यांची यादी तपासून घ्या.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Shocking video Chhattisgarh: Monster Grandson Brutally Thrashes Elderly Grandmother With Cricket Bat In Raipur
“संस्कार कमी पडले” नातवाने आजीला बॅटने मारलं; ‘ती’ फक्त रडत राहिली; काळीज पिळवटून टाकाणारा VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
Wedding video groom denies chain from father in law during marriage viral video on social media
जावई नंबर १! भरलग्नात नवरदेवाने सासऱ्यांचा आग्रह नाकारला, ‘ती’ गोष्ट घेण्यास दिला नकार, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
Singh Rashi Bhavishya 2025 in Marathi
Leo 2025 Rashi Bhavishya : २०२५ मध्ये सिंह राशींना ‘हे’ महिने अत्यंत फायद्याचे; शिक्षण, नोकरी ते विवाह, कसे असेल वर्ष? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

१ जानेवारी २०२५ ला बँका बंद असतील की सुरू? (1 January 2025 bank open or not)

भारतीय रिझर्व्ह बँकेने अधिकृत सुट्यांच्या यादीत १ जानेवारी २०२५ ला सुट्टी जाहीर केलेली नाही. त्यामुळे ही नोंदणीकृत सुट्टी नाही. त्यामुळे संपूर्ण देशात बँका बंद राहणार नाहीत; मात्र बहुतांश बँका बंद राहतील, असा अंदाज आहे. या कालावधीत ग्राहक त्यांची कामे ऑनलाइन पद्धतीने करू शकतील. तसेच मोबाईल बँकिंग आणि एटीएमच्या माध्यमातूनही ते ही कामे करू शकतात.

जानेवारीमध्ये देशभरातील बँका १५ दिवस बंद राहणार असल्या तरी वेगवेगळ्या राज्यांनुसार वेगवेगळ्या सुट्या आहेत. आरबीआयने जाहीर केलेल्या सुट्यांच्या यादीतील काही सुट्या राष्ट्रस्तरीय आहेत. त्या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील. तसेच काही सुट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तरावरील आहेत. त्यामुळे त्या दिवशी फक्त संबंधित राज्यांमध्येच बँका बंद असतील. त्यामुळे उत्तर प्रदेशात जेव्हा बँका बंद असतील, तेव्हा महाराष्ट्रातील बँका बंद असतील, असा गैरसमज करून घेऊ नका.

जानेवारी २०२५ मध्ये ‘या’ दिवशी बँका राहणार बंद (Bank holidays in January 2025)

१ जानेवारी : नवीन वर्ष/ लोसांग नामसूंग- काही राज्यांमध्ये बँका बंद
२ जानेवारी : मन्नम जयंती
५ जानेवारी : रविवार
६ जानेवारी : गुरू गोविंद सिंग जयंती- चंदिगड, हरियाणा
११ जानेवारी : दुसरा शनिवार
१२ जानेवारी : रविवार- स्वामी विवेकानंद जयंती
१४ जानेवारी : मकर संक्रांती- पोंगल- अहमदाबाद, बंगळुरु, भुवनेश्वर, चेन्नई, गंगाटोक, गुवाहाटी, हैद्राबाद, तेलंगणा, कानपूर, लखनऊ
१५ जानेवारी : तिरुवल्लुवर दिवस, माघ बिहू – मकर संक्रांती – चेन्नई
१६ जानेवारी : उज्जावर तिरुनल – चेन्नई
१९ जानेवारी : रविवार
२२ जानेवारी : इमॉइन
२३ जानेवारी : नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती- आगरतळा, भुवनेश्वर, कोलकत्ता
२५ जानेवारी : चौथा शनिवार
२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन – सर्वत्र
३० जानेवारी : शहीद दिन

Baba Vangas Predictions 2025 : २०२५ मध्ये ‘या’ पाच राशी होणार अफाट श्रीमंत! नवीन वर्षात प्रचंड धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी

बँका बंद; पण ऑनलाइन कामं सुरू

बँकांना सुट्या असल्या तरी ग्राहक ऑनलाइन सेवांची मदत घेऊ शकतात. त्यात UPI, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांचा वापर करता येईल.

Story img Loader