Bank holidays in March 2025 : मार्चमध्ये होळी, धुलीवंदन, गुढीपाडवा, छत्रपती शिवाजी महाराज जयंती अशा विविध सण उत्सवांनिमित्त लोक सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन आखतात, तर काही जण आर्थिक नियोजनात गुंतलेले असतात. त्यांना बँकेसंबंधित महत्त्वाची कामं करायची असतात. जर तुमचेही मार्च महिन्यात बँकेसंबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण मार्चमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवार वगळता भारतातील सार्वजनिक आणि खाजगी बँका सात दिवस बंद राहणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या बँक हॉलिडे कॅलेंडरनुसार ७, १३, १४, १५, २२, २७, २८ मार्च रोजी बँका बंद राहतील. ३१ मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने या दिवशीही बँकांना सुट्टी असते. पण, संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. मार्चमध्ये कोणत्या राज्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहतील हे आपण येथे जाणून घेऊ.
शनिवार आणि रविवारीच्या एकूण सात सुट्ट्या
८ आणि २२ मार्च रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहतील. ८ मार्च हा महिन्याचा दुसरा शनिवार आहे आणि २२ मार्च हा महिन्याचा चौथा शनिवार असेल. याशिवाय २, ९, १६, २३ आणि ३० मार्च रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील. मार्चमध्ये एकूण सात सुट्ट्या असतील, ज्यामध्ये दोन शनिवार आणि पाच रविवार असतील. याशिवाय विविध सणांनिमित्त सात दिवस बँका बंद असतील.
मार्च २०२५ मध्ये या दिवशी बँका राहणार बंद (Bank Holidays In March 2025)
१) ७ मार्च : चापचर कुटनिमित्त मिझोरममधील सर्व बँका बंद
२) १३ मार्च : छोटी होळी, होलिका दहन आणि अट्टुकल पोंगलनिमित्त उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड आणि केरळमधील सर्व बँका बंद
३) १४ मार्च : होळी आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रसह काही राज्यांतील बँका बंद
४) १५ मार्च : होळी आणि याओशांग सणाच्या निमित्ताने त्रिपुरा, ओडिशा, मणिपूर आणि बिहारमधील सर्व बँका बंद राहतील.
५) २२ मार्च : बिहार दिनानिमित्त बिहारमधील सर्व बँका बंद
६) २७ मार्च : शब-ए-कद्रनिमित्त जम्मू-काश्मीरमधील सर्व बँका बंद
७) २८ मार्च : जुमात-उल-विदा आणि उगादीनिमित्त जम्मू-काश्मीर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामधील सर्व बँका बंद