December 2023 Bank Holidays : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये संप, साप्ताहिक सुट्ट्या आणि इतर काही महत्त्वाच्या दिवसांमुळे १८ दिवस (Bank Holiday December 2023) बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. आरबीआय डिसेंबरमधील सुट्ट्यांचं कॅलेंडर प्रसिद्ध केलं आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने डिसेंबरमध्ये सहा वेगवेगळ्या दिवशी विविध बँकांमध्ये संपावर जाण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याचा तुमचाही विचार असेल, तर आधी सुट्ट्यांची यादी तपासून घ्या.
डिसेंबरमध्ये देशभरातील बँका १८ दिवस बंद राहणार असल्या तरी वेगवेगळ्या राज्यांनुसार वेगवेगळ्या सुट्ट्या आहे. RBI ने जाहीर केलेल्या सुट्टीच्या यादीतील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय स्तराच्या आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. तसेच काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तराच्या असतात. त्या दिवशी बँकेच्या शाखा फक्त त्याच्याशी संबंधित राज्यांमध्येच बंद असतात. त्यामुळे ज्या दिवशी महाराष्ट्रात बँका बंद असतील, त्याच दिवशी उत्तर प्रदेशातही बँकांचे कामकाज होणार नाही, असे समजू नका.
६ दिवसांचा बँक संप
बँक युनियनने ६ दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. SBI, पंजाब नॅशनल बँक ४ डिसेंबर २०२३ रोजी, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया ५ डिसेंबर रोजी, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ६ डिसेंबर रोजी , ७ डिसेंबर रोजी इंडियन बँक आणि UCO बँक, ८ डिसेंबर रोजी युनियन बँक ऑफ इंडियासह बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक संपामुळे ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व खासगी बँका बंद राहणार आहेत.
ही आहे सुट्ट्यांची यादी
१ डिसेंबर २०२३ रोजी राज्य स्थापना दिनानिमित्त अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये बँकांना सुट्टी असेल.
३ डिसेंबर रोजी रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.
४ डिसेंबर रोजी सेंट फ्रान्सिस झेवियर महोत्सवानिमित्त गोव्यात बँका बंद राहणार आहेत.
९ डिसेंबर हा महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
१० डिसेंबरला रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.
१२ डिसेंबर रोजी मेघालयातील स्थानिक सुट्टीमुळे बँका बंद राहतील.
१३ डिसेंबरला सिक्कीममध्ये बँकेला सुट्टी असेल.
१४ डिसेंबरलाही सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.
१७ डिसेंबर रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
१८ डिसेंबर रोजी मेघालयातील बँकांना सुट्टी असेल.
१९ डिसेंबर रोजी गोव्यात मुक्ती दिनानिमित्त बँकेला सुट्टी असेल.
२३ डिसेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.
२४ डिसेंबरला रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
२५ डिसेंबर रोजी ख्रिसमसनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
२६ डिसेंबर रोजी मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये ख्रिसमसच्या उत्सवामुळे बँका बंद राहतील.
२७ डिसेंबर रोजी नागालँडमध्ये बँका बंद राहतील.
३० डिसेंबर रोजी योगी नागवामुळे मेघालयमध्ये बँका बंद राहणार आहेत.
३१ डिसेंबर रविवार असल्याने देशभरातील बँकांमध्ये कामकाज होणार नाही.