Bank Holidays in November 2023 : ऑक्टोबर महिना शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. सध्या भारतात सणांचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत बँकांनाही सुट्ट्या मिळणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्राहकांच्या सोयीसाठी बँक सुट्ट्यांची यादी अगोदरच प्रसिद्ध करीत असते. जेणेकरून तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. तुम्हालाही बँकांशी संबंधित महत्त्वाची कामं नोव्हेंबरमध्ये पूर्ण करायची असल्यास येथे सुट्ट्यांची यादी नक्की पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोव्हेंबरमध्ये बरेच दिवस बँका राहणार बंद

नोव्हेंबर महिन्यात बँका १५ दिवस बंद राहतील. यामध्ये दिवाळी (Diwali 2023), गोवर्धन पूजा (Govardhan Puja 2023), छठ (Chhath Puja 2023) इत्यादी सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्हाला बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे पुढील महिन्यात पूर्ण करायची असतील तर सुट्ट्यांची ही यादी एकदा नक्की पाहा.

नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘या’ दिवशी बँका राहणार बंद

१ नोव्हेंबर २०२३- कन्नड राज्योत्सव/कुट/करवा चौथमुळे बंगळुरू, इन्फाळ आणि शिमला येथे बँका बंद राहतील.
५ नोव्हेंबर २०२३- रविवारची सुट्टी
१० नोव्हेंबर २०२३- गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
११ नोव्हेंबर २०२३- दुसरा शनिवार
१२ नोव्हेंबर २०२३- रविवार
१३ नोव्हेंबर २०२३- गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळीनिमित्त आगरतळा, डेहराडून, गंगटोक, इंफाळ, जयपूर, कानपूर, लखनौ येथील बँकांना सुट्टी असेल.
१४ नोव्हेंबर २०२३- अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, गंगटोक, मुंबई, नागपूर येथील बँकांना दिवाळी (बळी प्रतिपदा) / विक्रम संवत नवीन वर्ष / लक्ष्मीपूजनामुळे सुट्टी असेल.
१५ नोव्हेंबर २०२३- गंगटोक, इन्फाळ, कानपूर, कोलकाता, लखनौ आणि शिमला येथे भाई दूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा/निंगल चक्कूबा/भ्रात्री द्वितीयेमुळे बँका बंद राहतील.
१९ नोव्हेंबर २०२३- रविवारची सुट्टी
२० नोव्हेंबर २०२३- पाटणा आणि रांचीमध्ये छठपूजेनिमित्त बँका बंद राहतील.
२३ नोव्हेंबर २०२३- सेंग कुट स्नेम/इगास बागवालमुळे डेहराडून आणि शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
२५ नोव्हेंबर २०२३- चौथा शनिवार
२६ नोव्हेंबर २०२३- रविवार
२७ नोव्हेंबर २०२३- गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमेमुळे, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इन्फाळ, कोची, पणजी, पाटणा, त्रिवेंद्रम आणि शिलाँग वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
३० नोव्हेंबर २०२३- कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.

सुट्ट्यांच्या काळात बँकांची कामं कशी हाताळावीत?

बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशा स्थितीत बँकांना सततच्या दीर्घ सुट्ट्यांमुळे काही वेळा महत्त्वाची आर्थिक कामे ठप्प होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तुम्ही नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा UPI च्या माध्यमातून एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank holidays in november 2023 festive holidays banks will be closed for 15 days in november complete list in one click vrd
Show comments