देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात अधिक नफा कमविण्याची संधी दिली आहे. बँकेने त्यांच्या विविध मुदत ठेवींच्या (FD) कालावधीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यापूर्वी बँक ऑफ बडोदाने मे २०२३ आणि मार्च २०२३ मध्ये किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती.
व्याजदर किती वाढले?
बँक ऑफ बडोदाने ३ वर्षांपर्यंतच्या विविध कालावधीसाठी FD वरील व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढ केली आहे. बँकेने सांगितले की, हे नवे दर ९ ऑक्टोबर २०२३ पासून २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू करण्यात आले आहेत.
हेही वाचाः HDFC बँकेच्या ग्राहकांचा EMI वाढणार, बँकेने MCLR दर वाढवला
कालावधी | सामान्य नागरिकांसाठी नवे व्याजदर | वरिष्ठ नागरिकांसाठी नवे व्याजदर |
७ दिवस ते १४ दिवस | ३ | ३.५० |
१५ दिवस ते ४५ दिवस | ३.५० | ४ |
४६ दिवस ते ९० दिवस | ५ | ५.५० |
९१ दिवस ते १८० दिवस | ५ | ५.५० |
१८१ दिवस ते २१० दिवस | ५.५० | ६ |
२११ दिवस ते २७० दिवस | ६ | ६.५० |
२७१ दिवस ते १ वर्ष | ६.२५ | ६.७५ |
२ वर्ष ते ३ वर्ष | ७.२५ | ७.७५ |
बडोदा तिरंगा प्लॅन ३९९ दिवस | ७.१५ | ७.६५ |
हेही वाचाः इस्रायलमध्ये अडकले TCS चे काही कर्मचारी, कंपनीकडून कर्मचार्यांच्या सुरक्षेवर बारकाईने नजर
आता तुम्हाला किती व्याज मिळणार?
नवे दर लागू झाल्यानंतर बँक आता आपल्या ग्राहकांना २ ते ३ वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त ७.२५ टक्के व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी ७.७५ टक्के व्याज मिळत आहे. सध्याच्या ग्राहकांनाही वाढलेल्या व्याजदराचा फायदा होणार आहे. याशिवाय बँकेने आपल्या तिरंगा प्लस ठेव योजनेवर ३९९ दिवसांसाठी व्याजदरदेखील बदलले आहेत.