पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत ८४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार नोंदवला. थकीत कर्जांमध्ये झालेली घट आणि व्याज उत्पन्नामध्ये झालेली वाढ यामुळे बँकेचा निव्वळ नफा वार्षिक तुलनेत दुपटीहून अधिक वाढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बँकेच्या जानेवारी ते मार्च तिमाहीतील निकाल जाहीर करताना, महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव म्हणाले, मागील वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत बँकेला ३५५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. यंदा याच तिमाहीत बँकेला ८४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न ५,३१७ कोटी रुपयांवर पोहोचले. मागील वर्षी याच कालावधीत ते ३,९४९ कोटी रुपये होते.

बँकेचे व्याज उत्पन्न तिमाहीत ४,४९५ कोटी रुपये आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ते ३,४२६ कोटी रुपये होते. बँकेच्या संचालक मंडळाने लाभांशही जाहीर केला आहे. प्रति समभाग १.३० रुपये अथवा १० रुपये दर्शनी मूल्याच्या १३ टक्के या प्रमाणात हा लाभांश असेल. चालू आर्थिक वर्षात बँक ५ लाख कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचे उद्दिष्ट गाठेल, असे राजीव यांनी नमूद केले.

हजार कोटींची भांडवल उभारणी

महाबँकेतील सरकारी हिस्सा काही प्रमाणात कमी करून त्याची विक्री केली जाणार आहे. या समभाग विक्रीतून एप्रिल ते जून तिमाहीत एक हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येईल. त्यानंतर बाजारातील स्थितीनुसार फॉलो-ऑन समभाग विक्री (एफपीओ) अथवा पात्र संस्थागत गुंतवणूकदारांना (क्यूआयपी) प्राधान्य विक्री करून आणखी एक हजार कोटी रुपये उभारले जातील, असे महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक राजीव यांनी सांगितले.