पुणे : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्रला (महाबँक) राजभाषेचा सर्वोच्च सन्मान ‘कीर्ती पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. या वर्षी बँकेला श्रेष्ठ गृह पत्रिका या श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळाला. नवी दिल्ली येथे आयोजित हिंदी दिवस कार्यक्रमात बँकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कॉसमॉस बँकेला सर्वोत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते बँकेचे कार्यकारी संचालक आशीष पाण्डेय यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी मंचावर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, गृह मंत्रालयाच्या सचिव (राजभाषा) अंशुली आर्या आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाबँकेेचे सरव्यवस्थापक संतोष दुलड आणि उपसरव्यवस्थापक डॉ. राजेंद्र श्रीवास्तव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच, देशभरातील विविध सरकारी कार्यालये, उपक्रम आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी व राजभाषा अधिकाऱ्यांचीही या कार्यक्रमाला हजेरी होती.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank of maharashtra awarded rajbhasha kirti puraskar by the union home ministry print eco news zws