पुणे: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) गृह, चारचाकी वाहन, शिक्षण यासह रेपो दरांशी जोडलेल्या अन्य कर्जांच्या व्याजदरात पाव टक्का कपात केली आहे. प्रदीर्घ काळानंतर झालेली ही कपात बँकेच्या कर्जदारांसाठी दिलासा देणारी आहे.
गृह व चारचाकी वाहन कर्जांवरील प्रक्रिया शुल्क बँकेने आधीच माफ केले आहे. प्रक्रिया शुल्क माफी आणि व्याज दरातील घट असा दुहेरी लाभ आता ‘महाबँके’च्या ग्राहकांना मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून पाच वर्षांनंतर केल्या गेलेल्या रेपो दरातील कपातीनंतर, स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आता महाबँकेने व्याजदर कमी केल्यांने, इतर बँकाकडून देखील कर्ज स्वस्त केली जाण्याची शक्यता आहे.
सध्या बँक ऑफ महाराष्ट्रचे गृह कर्ज ८.१० टक्के व्याजदरापासून सुरू होते. चार चाकी वाहनांसाठी ८.४५ टक्के व्याजदरापासून बँक कर्ज देत आहे. गृह कर्जाचे सुधारित व्याजदर व प्रक्रिया शुल्कातील सलवतीबाबत तसेच महाबँक देऊ करीत असलेल्या अन्य सर्व वित्तीय सेवांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी https://bankofmaharashtra.in/ या बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
स्वस्त कर्ज, प्रक्रिया शुल्कात माफीही…या बँकेकडून ग्राहकांना दुहेरी लाभ
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) गृह, चारचाकी वाहन, शिक्षण यासह रेपो दरांशी जोडलेल्या अन्य कर्जांच्या व्याजदरात पाव टक्का कपात केली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-02-2025 at 06:14 IST | © The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank of maharashtra cuts loan interest rates by a quarter percent print eco news amy