पुणे: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) गृह, चारचाकी वाहन, शिक्षण यासह रेपो दरांशी जोडलेल्या अन्य कर्जांच्या व्याजदरात पाव टक्का कपात केली आहे. प्रदीर्घ काळानंतर झालेली ही कपात बँकेच्या कर्जदारांसाठी दिलासा देणारी आहे.
गृह व चारचाकी वाहन कर्जांवरील प्रक्रिया शुल्क बँकेने आधीच माफ केले आहे. प्रक्रिया शुल्क माफी आणि व्याज दरातील घट असा दुहेरी लाभ आता ‘महाबँके’च्या ग्राहकांना मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून पाच वर्षांनंतर केल्या गेलेल्या रेपो दरातील कपातीनंतर, स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आता महाबँकेने व्याजदर कमी केल्यांने, इतर बँकाकडून देखील कर्ज स्वस्त केली जाण्याची शक्यता आहे.
सध्या बँक ऑफ महाराष्ट्रचे गृह कर्ज ८.१० टक्के व्याजदरापासून सुरू होते. चार चाकी वाहनांसाठी ८.४५ टक्के व्याजदरापासून बँक कर्ज देत आहे. गृह कर्जाचे सुधारित व्याजदर व प्रक्रिया शुल्कातील सलवतीबाबत तसेच महाबँक देऊ करीत असलेल्या अन्य सर्व वित्तीय सेवांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी https://bankofmaharashtra.in/ या बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा