एपी, वॉशिंग्टन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमेरिकेतील बँकबुडीनंतर देशातील बँकिंग व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री जॅनेट येलेन या सिनेटच्या वित्त समितीपुढे देशातील बँकिंग व्यवस्थेच्या समर्थनार्थ भूमिका मांडणार आहेत. अमेरिकी नागरिकांनी त्यांच्या ठेवींबद्दल काळजी करू नये, असेही आवाहन त्या करणार आहेत.
अमेरिकेतील दोन बँका बुडाल्यानंतर त्यांच्या ठेवीदारांना ठेवींवर विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुद्द्यावर सिनेटला सामोरे जाणाऱ्या बायडन प्रशासनातील जॅनेट येलेन या पहिल्या मंत्री ठरणार आहेत. अनेक निरीक्षकांनी बँकांना दिवाळखोरीतून सावरण्यासाठी हात देण्यावर टीका केली आहे. येलेन यांनी सिनेटसमोर मांडावयाची भूमिका तयार केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी सरकारने निर्णायक पावले उचलली. आपली बँकिंग व्यवस्था सुस्थितीत आहे, हे मला समितीच्या सदस्यांना सांगावयाचे आहे. नागरिकांना त्यांच्या ठेवी गरजेच्या वेळी मिळतील, यावर पूर्णपणे विश्वास ठेवावा.
एका आठवड्याच्या कालावधीत कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली होती. याचबरोबर न्यूयॉर्कस्थित सिग्नेचर बँकही बुडाली. या बँकांच्या ठेवीदारांसाठी अडीच लाख डॉलरपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच, नियामक संस्थेने या बँकबुडीची चौकशीही सुरू केली आहे.