Bank Deposit Growth Rate : व्याजदरात वाढ झाल्यामुळे बँकांच्या ठेवींमध्येही वाढ होत आहे आणि ती ११ ऑगस्टपर्यंत १३.५ टक्क्यांसह सहा वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. केअर एज रेटिंग्सच्या अहवालानुसार, २०१७ नंतर ही पहिलीच वेळ आहे की ठेवींची वाढ १२.५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ठेवीतील वाढ ही गेल्या काही महिन्यांतील पत वाढीच्या निम्मी होती आणि अनेक बँकांनी व्याजदर वाढवल्यामुळे ठेवींची वाढ झाली आहे.
पतधोरणातही वाढ झाली
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतर पत वाढ १९.७ टक्क्यांवर पोहोचली आहे. जर हे विलीनीकरण झाले नसते तर ते १४.८ टक्क्यांपेक्षा जास्त झाली नसती, असे या अहवालात सांगण्यात आले. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण हे देशातील कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठे विलीनीकरण होते. त्याचा आकार ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होता. ठेव वाढीवर विलीनीकरणाचा परिणाम मर्यादित होता.
हेही वाचाः मुकेश अंबानींच्या रिलायन्सने १६,००० कोटींहून अधिक कर भरला, केला नवा विक्रम
अहवालात पुढे असे निदर्शनास आणले आहे की, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे नंतरचे विलीनीकरण झाले नसते तर एचडीएफसी लिमिटेड ठेवी स्वीकारत नसल्यामुळे ठेवींची वाढ १२.८ टक्के झाली असती.
हेही वाचाः प्रधानमंत्री जन धन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीला नऊ वर्षे पूर्ण; नेमका फायदा काय झाला?
२००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा परिणाम
२००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने बँकांच्या ठेवी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ठेवींच्या वाढीचा दर अनेक वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. बँकेच्या कर्जाबाबतचा कलही सकारात्मक राहील, असे अहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये वैयक्तिक कर्ज विभाग सर्वोत्तम कामगिरी करेल. जागतिक अस्थिरता आणि केंद्रीय बँकांच्या कडक पतधोरणामुळे व्याजदर चढेच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.