वृत्तसंस्था, मुंबई

अदानी समूहावरील लाचखोरीच्या आरोपांमुळे सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने समूहाच्या आर्थिक आरोग्यमानावर परिणामाचा आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेचे पुनरावलोकन केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
PMC Bank Scam Hearing on petitions of aggrieved account holders on December 12 mumbai news
पीएमसी बँक घोटाळा; पीडित खातेधारकांच्या याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी
Loans from State Bank, HDFC,
एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…

स्टेट बँकेसह अदानी समूहातील कंपन्यांना कर्ज देणाऱ्या, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, आयसीआयसीआय बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक आणि आरबीएल बँक देखील याप्रकारे आढावा घेतला जात आहे. अदानी समूहाला नव्याने कर्ज देताना आणखी काळजी घेण्यासह, अन्य उपायांबाबत बँकाकडून चाचपणी सुरू आहे. अदानी समूहावरील एकूण कर्जात बँकांनी दिलेले कर्जाचे प्रमाण कमी असल्याने या टप्प्यावर बँकिंग प्रणालीला घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयआयएफएल सिक्युरिटीज या दलालीपेढीच्या माहितीनुसार, भारतीय बँकांमध्ये स्टेट बँकेने अदानींना सर्वाधिक ४ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ३३,७९० कोटी डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. अदानी समूहाचे जे प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने आहेत, त्या प्रकल्पांचा अर्थप्रवाह कायम राहणार आहे. शिवाय समूहाने सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्या आहेत की नाही, याबाबत बँक नवीन कर्ज वितरण करताना सावधगिरी बाळगणार आहे. स्टेट बँकेसह कोणत्याही बँकेने अदानी समूहाबाबत अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा >>>एनटीपीसी ग्रीन एनर्जीने केले मालामाल; समभाग १२ टक्के तेजीत

आघाडीची पतमानांकन संस्था असलेल्या ‘मूडीज’ने देखील मंगळवारी अदानी समूहातील सात कंपन्यांबाबतचा दृष्टिकोन ‘स्थिर’वरून, ‘नकारात्मक’ असा बदलून घेतला आहे, तर कथित लाचखोरीचे प्रकरण उजेडात आल्यांनतर ‘फिच रेटिंग्स’नेही काही कर्ज रोख्यांचे मानांकन नकारात्मक केले आहे. जागतिक मान्यतेच्या या संस्थांचा हा नकारात्मक कल समूहासाठी गुंतवणूकदारांपुढे निधी उभारणीसाठी जाताना अडचणीचा ठरेल.

अदानी समूहातील पाच कंपन्यांचे समभाग तेजीत

भांडवली बाजारातील मंदीसदृश वातावरणातही अदानी समूहाच्या ११ सूचिबद्ध कंपन्यापैकी पाच कंपन्यांचे समभाग गुरुवारच्या सत्रात तेजीसह स्थिरावले. अदानी टोटल गॅसच्या समभागाने सुमारे १६ टक्क्यांची उसळी घेतली.

अदानी टोटल गॅसचा समभाग १५.८२ टक्क्यांनी म्हणजेच १०९.८० रुपयांनी वधारून ८०३.८५ रुपयांवर बंद झाला. त्यापाठोपाठ अदानी एनर्जी सोल्युशन्सचा समभाग १० टक्क्यांनी वधारून ७२६.८५ रुपयांवर बंद झाला. अदानी ग्रीन एनर्जीचा समभाग १,०८७.२० रुपयांवर बंद झाला, त्याने ९८.८० म्हणजेच १० टक्क्यांची उसळी घेतली. अदानी पॉवर ७.२६ टक्क्यांनी वधारून ५६१ रुपयांवर बंद झाला. अदानी एंटरप्रायझेस १.६४ टक्क्यांच्या तेजीसह २,४३७.१० रुपयांवर बंद झाला. तर समूहातील इतर कंपन्यांमध्ये अदानी पोर्ट २.७० टक्के, एनडीटीव्ही २.११ टक्के, एसीसी सिमेंट ०.८२ टक्के, अंबुजा सिमेंट ०.३९ टक्के आणि अदानी विल्मर ०.४३ टक्के आणि सांघी इंडस्ट्रीज ०.१७ टक्क्यांसह घसरला आहे.