रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जून २०२३ मध्ये बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात महत्त्वाच्या कामासाठी बँक शाखेत जाण्यापूर्वी तुम्ही बँकेच्या सुट्टीची यादी तपासून घ्या. या यादीनुसार जून २०२३ मध्ये एकूण १२ दिवस बँका बंद राहणार आहेत.
जून महिन्यात एकूण १२ दिवस सुट्ट्या असणार आहेत. यातील अनेक सुट्ट्या लागोपाठही येणार आहेत. परंतु त्या सगळ्या राज्यात एकसमान नाहीत, संपूर्ण देशात १२ दिवस बँका बंद राहणार नाहीत. RBI च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या बँक हॉलिडेज लिस्टनुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. त्याच वेळी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. आजकाल बँकेची बहुतांश कामे घरी बसून केली जातात, पण तरीही अनेक कामांसाठी बँकेच्या शाखेत जावे लागते. अशा परिस्थितीत बँकांच्या सुट्ट्यांची माहिती घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, जेणेकरून गैरसोय टाळता येईल. जून २०२३ मध्ये कोणत्या राज्यांमध्ये बँका बंद राहतील हे जाणून घेऊयात.
जूनमध्ये ‘या’ दिवशी बँका बंद राहतील
०४ जून २०२३ – हा दिवस रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल.
१० जून २०२३ – हा दिवस महिन्याचा दुसरा शनिवार आहे, त्यामुळे बँकांना सुट्टी असेल.
११ जून २०२३ – या दिवशी रविवार असल्यामुळे सुट्टी असेल.
१५ जून २०२३- हा दिवस राजा संक्रांती आहे, त्यामुळे मिझोराम आणि ओडिशामध्ये बँका बंद राहतील.
१८जून २०२३ – या दिवशी रविवारची सुट्टी असेल.
२० जून २०२३ – या दिवशी रथयात्रा निघेल, त्यामुळे ओडिशा आणि मणिपूरच्या बँका बंद राहतील.
२४ जून २०२३ – हा दिवस जूनचा शेवटचा आणि चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
२५ जून २०२३ – रविवार बँकांना सुट्टी असेल
२६ जून २०२३ – या दिवशी फक्त त्रिपुरातच खार्ची पूजेमुळे बँका बंद राहतील.
२८ जून २०२३ – ईद उल अजहामुळे महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.
२९ जून २०२३ – ईद उल अजहामुळे देशभरातील बँका बंद राहतील
३० जून २०२३ – रिमा ईद उल अजहानिमित्त मिझोराम आणि ओडिशामधील बँका बंद राहतील.
हेही वाचाः विश्लेषण: तीन वर्षांनंतर २०२३ मध्येच RBI कडून US डॉलरची उच्च विक्री कशासाठी?