Barclays Bank Layoffs: यूकेची बहुराष्ट्रीय बार्कलेज बँक मोठ्या नोकर कपातीची तयारी करीत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, १ अब्ज पौंड किंवा १.२५ अब्ज डॉलर्सच्या खर्चात कपात करण्यासाठी किमान २ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाऊ शकते. बार्कलेज बँक ही जगातील १० वी सर्वात मोठी बँक आहे आणि तिच्याकडे ८१,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. बँकेची स्थापना ३३३ वर्षांपूर्वी १६९० मध्ये झाली.

भारतीय कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार का?

बार्कलेज बँकेत मोठ्या प्रमाणावर नोकर कपातीच्या बातम्या येत होत्या. भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बार्कलेज बँकेच्या या नोकर कपातीचा परिणाम प्रामुख्याने ब्रिटिश बँकेच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे. बँकेचे व्यवस्थापक आढावा घेण्याच्या कामात व्यस्त असून, कंपनीने आपली योजना पुढे रेटल्यास किमान १५०० ते २००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.

rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
indians want to move abroad indians want opportunity to leave India
भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?
HDFC Bank loan rate hike installment of home loan car loan increase print eco news
एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार काय?
Bank of baroda recruitment 2024 bank of baroda is conducting the recruitment for 592 Vacancies
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ५९२ जागांसाठी अर्ज करा अन् घ्या घसघशीत पगार
Bank Of Baroda Recruitment 2024
Bank Of Baroda Recruitment 2024: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ५९२ जागांसाठी आजच भरा अर्ज, पाहा Viral Video

हेही वाचाः Black Friday sale : ऑनलाइन शॉपिंगमध्ये ‘या’ टिप्स वापरा, फसवणुकीपासून होणार सुटका

१ अब्ज पौंडांनी खर्च कमी करण्याचे लक्ष्य

बार्कलेजचे सीईओ सीएस वेंकटकृष्णन (C. S. Venkatakrishnan)  यांनी सांगितले की, बँक येत्या काही दिवसांत एकूण अब्जावधी पौंडांच्या खर्चात कपात करण्याचा विचार करीत आहे. या कपातीचा सर्वाधिक परिणाम बार्कलेज एक्झिक्युशन सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे, ज्यांना BX म्हणून ओळखले जाते.

हेही वाचाः Black Friday sale: विजय सेल्सपासून ते क्रोमापर्यंत ब्लॅक फ्रायडे सेलला सुरुवात, स्मार्टफोन अन् लॅपटॉपवर जबरदस्त सवलत

रॉयटर्सच्या बातम्यांनुसार, बार्कलेज दीर्घकालीन किरकोळ आणि गुंतवणुकीच्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी नोकर कपातीचा पर्यायही अवलंबला जात आहे. याबरोबरच बँकेने कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्येही कपात केली आहे. या नोकर कपातीद्वारे बँकेला आपला खर्च ते उत्पन्न गुणोत्तर सुधारायचे आहे आणि हे सीईओ सीएस वेंकटकृष्णन यांच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक आहे.