Bank of Baroda Hikes Retail Term Deposit Rates : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाच्या किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. बँकेने निवडक मुदत ठेवींसाठी व्याजदरात ०.३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यामध्ये एनआरओ आणि एनआरई मुदत ठेवींचाही समावेश आहे. बँक ऑफ बडोदाने केवळ किरकोळ मुदत ठेवींवरच नव्हे, तर त्यांच्या ३९९ दिवसांच्या विशेष ‘बडोदा तिरंगा प्लस ठेव योजने'(Baroda Tricolor Plus Deposit Scheme)वरही व्याजदर वाढवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्या योजनेवर व्याजदर किती वाढला?

बँक ऑफ बडोदाने २ कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवून ७.०५ टक्के केला आहे. पूर्वी तो ६.७५ टक्के होता. हा व्याजदर २ ते ३ वर्षांच्या मुदत ठेवींसाठी असणार आहेत. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर ७.५५ टक्के असेल, जो पूर्वी ७.२५ टक्के होता. तसेच बडोदा तिरंगा प्लस योजनेंतर्गत ठेव २ कोटी रुपयांपेक्षा कमी असल्यास सामान्य लोकांना ७.२५ टक्के व्याज मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज मिळेल. यापूर्वी हा व्याजदर अनुक्रमे ७.०५ टक्के आणि ७.५५ टक्के होता.

हेही वाचाः एलपीजी विसरा, आता इंडियन ऑइल घरोघरी देणार सीएनजी-पीएनजी कनेक्शन, तुम्हीही असा मिळवू शकता फायदा

तिरंगा डिपॉजिट प्लस व्याजदरात वाढ

बँकेने आपल्या बडोदा तिरंगा डिपॉजिट प्लस योजनेच्या व्याजदरातही वाढ केली आहे. आता या योजनेत लोकांना कमाल ७.९० टक्के व्याज मिळणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्रपणे ०.५० टक्के अतिरिक्त व्याजाचा समावेश आहे. बँकेचे वाढलेले व्याजदर १२ मेपासून लागू झाले आहेत. बँकेने बडोदा अॅडव्हांटेज एफडीचा व्याजदर ७.३० टक्के केला आहे. पूर्वी तो ७ टक्के होता. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ७.८० टक्के व्याज मिळेल. या योजनेंतर्गत किमान १५.०१ लाख रुपये जमा करावे लागतील. बडोदा ट्रायकलर प्लस अंतर्गत लोकांना त्याच ठेवीवर ७.४० टक्के व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.९० टक्के असेल. बँकेने यापूर्वी या वर्षी मार्च आणि डिसेंबर २०२२ मध्ये मुदत ठेव योजनेच्या व्याजदरात वाढ केली होती.

हेही वाचाः गौतम अदाणींना पैशांची गरज; निधी उभारण्यासाठी अशा प्रकारे तयार केला ‘मास्टर प्लॅन’

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baroda tricolor plus deposit scheme bank hiked interest rates on fixed deposits now you will get so much return vrd
Show comments