पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार २८ ऑक्टोबर २०२३ रोजी रोजगार मेळाव्यात सरकारी विभागांमध्ये नियुक्त केलेल्या ५१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करतील. पंतप्रधान दुपारी १ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याच्या या कार्यक्रमात सामील होतील, ज्यामध्ये नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली जातील. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी तरुणांना संबोधितही करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात एकूण ३७ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच या मोहिमेशी संबंधित राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या नियुक्त्या करण्यात येत आहेत. देशभरातून निवड झालेले नवनियुक्त कर्मचारी हे रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य मंत्रालय यासारख्या सरकारच्या विविध विभागांतून आलेले आहेत. रोजगार मेळावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी एक मोठे पाऊल आहे. रोजगार मेळा रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल.

हेही वाचाः कांद्याच्या भावात ५७ टक्क्यांनी वाढ, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने ‘बफर स्टॉक’मधून विक्री वाढवली

नियुक्त केल्या जाणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना iGOT कर्मयोगी पोर्टलवर कर्मयोगी प्ररंभ या ऑनलाइन मॉड्यूलद्वारे स्वतःला प्रशिक्षण देण्याची संधी मिळेल. ७५० हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे कर्मचारी कुठूनही आणि कोणत्याही उपकरणाद्वारे त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतात.

हेही वाचाः Money Mantra : ९ वर्षांत प्राप्तिकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत ९० टक्के वाढ, करदात्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ

जून २०२२ मध्ये पंतप्रधानांनी घोषणा केली होती की, पुढील दीड वर्षात म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी १० लाख लोकांना मिशन मोडमध्ये सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. जून २०२२ मध्ये पंतप्रधानांनी स्वतः सर्व सरकारी मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांचा आढावा घेतला, त्यानंतर भरतीचा निर्णय घेण्यात आला.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before diwali prime minister narendra modi will give a big gift to 51 thousand people appointment letter for government jobs vrd
Show comments