वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या भारती एअरटेलने टाटा समूहाशी टाटा प्लेच्या डायरेक्ट-टू-होम (डीटीएच) व्यवसायाचे त्यांच्या उपकंपनी भारती टेलिमीडिया लिमिटेडसोबत विलीनीकरण करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे.

सध्या प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू असल्याचे भारती एअरटेलने बाजार मंचांना कळविले आहे. त्यांनतर टाटा प्ले आणि एअरटेल डिजिटल टीव्ही विलीनीकरणाकडे वाटचाल करत असल्याचे वृत्त सर्वत्र प्रसारित झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विलीनीकरण करार समभागांच्या स्वॅपद्वारे होण्याची शक्यता आहे. ज्यायोगे एअरटेलचा विलीनीकरण झालेल्या संस्थेत ५० टक्क्यांहून अधिक हिस्सा असेल. या विलीनीकरणामुळे एअरटेलला दूरसंचार क्षेत्राव्यतिरिक्त इतर विभागातून उत्पन्न वाढविण्यास मदत होईल.

या विलीनीकरणामुळे एअरटेलला टाटा प्लेच्या माध्यमातून सुमारे २ कोटी घरांमध्ये प्रवेश मिळणार आहे. यामुळे ब्रॉडबँड, टेलिकॉम आणि डीटीएच योजना एकाच छताखाली एकवटतील. वर्ष २०१६ मध्ये व्हिडिओकॉन डी२एच आणि डिश टीव्हीच्या विलीनीकरणानंतर या क्षेत्रातील हा दुसरा मोठा करार असेल.

टाटा स्कायने २००४ मध्ये टाटा सन्स आणि रूपर्ट मर्डोक यांच्या संयुक्त उपक्रमातून आपल्या सेवा सुरू केल्या. मार्च २०१९ मध्ये, वॉल्ट डिस्ने कंपनीने फॉक्समधील हिस्सा खरेदी केला. २०२२ मध्ये डीटीएच प्रदात्याचे नाव ‘टाटा प्ले’ असे ठेवण्यात आले.