Bharti Airtel 5G Services By September 2023 : देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल ५जीसह सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शहर अन् प्रमुख ग्रामीण भाग व्यापण्यासाठी तयार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. तामिळनाडूमध्ये त्यांच्या ५जी नेटवर्कवरील ग्राहकांच्या संख्येनं २० लाखांचा टप्पाही ओलांडला आहे. देशात हे हाय-स्पीड नेटवर्क सुरू करणारी ही पहिली कंपनी असल्याचा दावा भारती एअरटेलने केला आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नईचा अल्ट्राफास्ट 5G प्लस सेवा प्राप्त करणाऱ्या पहिल्या आठ शहरांमध्ये समावेश आहे.
एअरटेलची 5G सेवा राज्यातील ५०० हून अधिक शहरे आणि ग्रामीण भागांमध्ये उपलब्ध आहे. या शहरांमध्ये कोईम्बतूर, मदुराई, त्रिची, तिरुपूर, वेल्लोर, होसूर आणि सेलम यांचा समावेश आहे. कंपनीचे तामिळनाडूचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण विरमानी म्हणाले, “तामिळनाडूमध्ये आमच्या 5G नेटवर्कवरील ग्राहकांची संख्या २० लाखांच्या पार गेली आहे.” या सेवेची ताकद अनुभवण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने कंपनीने अमर्यादित (Unlimited) 5G डेटा ऑफर केला आहे. एअरटेलने राज्यातील सर्व विद्यमान टॅरिफ प्लॅनवरील डेटा वापर मर्यादा काढून टाकली आहे.
हेही वाचाः सेबीने फरार उद्योगपती मेहुल चोक्सीला पाठवली ५.३५ कोटींच्या दंडाची नोटीस; १५ दिवसांत पैसे भरा अन्यथा…
विशेष म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील कंपनीच्या 5G नेटवर्कवरील ग्राहकांची संख्या २० लाखांवर पोहोचली होती. सर्व क्षेत्रात 5G कव्हरेज असलेले मुंबई हे देशातील पहिले शहर आहे. मुंबईव्यतिरिक्त नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि मीरा भाईंदरचाही समावेश आहे. कंपनीने म्हटले होते की, “भारती एअरटेलने मुंबईतील 5G नेटवर्कवर २० लाख ग्राहकांचे स्वागत केले आहे. ही सेवा सुरू झाल्यापासून अवघ्या सात महिन्यांत ही वाढ झाली आहे.” अलीकडेच, एअरटेलने देशभरातील आपल्या नेटवर्कवर एक कोटीहून अधिक ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे.
हेही वाचाः क्रेडिट कार्ड पेमेंटबाबतचा नियम बदलला, तुमचा परदेश प्रवास आता महागणार
५०-१०० mbps च्या रेंजमध्ये हाय-स्पीड डेटा सेवा देण्यासाठी मोबाइल टेलिकॉम सेगमेंटसाठी ६ GHz बँडच्या मध्यम फ्रिक्वेन्सी श्रेणीमध्ये स्पेक्ट्रम उपलब्ध ठेवण्याची मागणी दूरसंचार कंपन्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 5G सेवा २०० दिवसांपेक्षा कमी कालावधीत देशातील ६०० जिल्ह्यांमध्ये पोहोचली आहे. केंद्र सरकार म्हणते की, ते जगातील सर्वात वेगाने वाढणारे नेटवर्क आहे. गेल्या वर्षी देशात 5G सेवा सुरू करण्यात आली होती. रिलायन्स जिओ आणि एअरटेल वेगाने त्यांचे नेटवर्क वाढवत आहेत.