नवी दिल्ली, २४ मार्च (पीटीआय) दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची भारती एअरटेलची उपकंपनी भारती हेक्साकॉमची प्रारंभिक समभाग विक्री येत्या ३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पुढील तीन दिवस म्हणजे ५ एप्रिलपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येईल. नवीन आर्थिक वर्षात (२०२४-२५) मुख्य बाजारमंचाच्या माध्यमातून बाजारात पदार्पण करणारी भारती हेक्साकॉम पहिली कंपनी असेल.

हेही वाचा >>> आयआयएफल, जेएमएफपीएलचे रिझर्व्ह बँकेकडून विशेष लेखापरीक्षण

Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
adani group stocks gains
Adani Group Shares: काल शेअर बाजार कोसळल्यानंतर आज अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; कारण काय?
massive dividend shareholders TCS IT company
मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी
New Ipo In share market : Standard Glass Lining IPO
Standard Glass Lining IPO : दमदार कमाई करून देणार हा आयपीओ, गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल, जाणून घ्या, कशी करावी नोंदणी?
My Portfolio, Indiamart Intermesh Limited, buying and selling goods,
माझा पोर्टफोलिओ: वस्तू खरेदी-विक्रीचा लाभदायी विश्वासू मंच, इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड (बीएसई कोड ५४२७२६)
top 500 companies cash of rupees 7 68 lakh crores
शेअर बाजारातील कंपन्यांकडे आहे भरपूर पैसा, अव्वल ५०० कंपन्यांच्या ताळेबंदात ७.६८ लाख कोटींची रोकड
Image of Reliance Jio logo
Jio IPO : रिलायन्स जिओ २०२५ मध्ये घेऊन येणार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO, उभारणार ४० हजार कोटी रुपये

विद्यमान भागधारक टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया आयपीओच्या माध्यमातून ७.५ कोटी समभागांची विक्री करणार आहे. आंशिक समभाग विक्रीचे आकारमान नियोजित १० कोटी समभागांवरून ७.५ कोटी समभागांपर्यंत खाली आणले आहे. आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून विद्यमान भागधारक समभाग विक्री करणार असल्याने आयपीओच्या माध्यमातून कंपनीला कोणताही निधी प्राप्त होणार नाही. सध्या मुख्य प्रवर्तक भारती एअरटेलकडे ७० टक्के हिस्सेदारी आहे आणि उर्वरित ३० टक्के भागभांडवल सरकारी कंपनी टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडकडे आहे.

हेही वाचा >>> दिवाळखोर कंपन्यांतील हिस्सा विक्रीस मंजुरी द्या, आयएल अँड एफएसची राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणाकडे मागणी

भारती हेक्साकॉम मुख्यत: राजस्थान आणि ईशान्य दूरसंचार मंडळांमधील ग्राहकांना मोबाइल सेवा, फिक्स्ड-लाइन टेलिफोन आणि ब्रॉडबँड सेवा पुरवते. कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५४९.२ कोटी रुपयांच्या निव्वळ नफा मिळवला होता. त्याआधीच्या वर्षात कंपनीने १,९५१.१ कोटी रुपयां नफा नोंदवला होता. कंपनीचे समभाग राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध केले जाणार आहेत.

Story img Loader