RBI Fines ICICI Bank & Kotak Mahindra Bank: बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँक या दोन खासगी क्षेत्रातील बँकांवर दंड ठोठावला आहे. RBI ने ICICI बँकेला १२.१९ कोटी रुपये आणि कोटक महिंद्रा बँकेला ३.९५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्यामुळे या दोन्ही बँकांवर हा दंड ठोठावण्यात आला आहे, असंही दंड आकारणीबाबत माहिती देताना आरबीआयने सांगितले. RBI ने ICICI बँकेला १२.१९ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. कर्ज आणि अॅडव्हान्सशी संबंधित प्रकरणांमध्ये बँका निर्बंध आणि फसवणूक वर्गीकरण करण्यात अपयशी ठरल्यात. तसेच आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच वित्तीय सेवा पुरवत असताना व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांच्या वतीने फसवणुकीचे वर्गीकरण अन् अहवाल देताना RBI च्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल RBI ने ICICI बँकेवर दंड ठोठावला आहे.
हेही वाचाः खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट, बोनस केला जाहीर
RBI ने कोटक महिंद्रा बँकेला ३.९५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझव्र्ह बँकेने प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितले की, आर्थिक सेवांच्या आउटसोर्सिंगमध्ये जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल कोटक महिंद्रा बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई बँकेने नामनिर्देशित केलेल्या रिकव्हरी एजंटमधील कमतरता, ग्राहक सेवा, कर्ज आणि आगाऊ तरतुदींशी देखील संबंधित आहे. बँकेचे वैधानिक लेखापरीक्षण ३१ मार्च २०२२ रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीच्या आधारे करण्यात आले होते.
हेही वाचाः डाबर इंडियाला ३२१ कोटींच्या जीएसटी थकबाकीची मिळाली नोटीस
सेवा पुरवठादारांकडून वार्षिक आढावा घेण्यात बँक अपयशी ठरल्याचे आरबीआयला आढळले. विशेष म्हणजे संध्याकाळी ७ नंतर आणि सकाळी ७ वाजेपूर्वी ग्राहकांशी संपर्क साधला गेला नाही, याची खात्री करण्यातही ते अपयशी ठरले. अटींच्या विरोधात जाऊन कर्ज वाटपाच्या वास्तविक तारखेऐवजी वितरणाच्या देय तारखेपासून व्याज आकारले गेले आहे. तसेच कर्जाच्या करारामध्ये फोरक्लोजर चार्जेसची तरतूद नसतानाही फोरक्लोजर चार्जेस लावण्यात आले आहेत. RBI च्या म्हणण्यानुसार, दोन्ही प्रकरणांमध्ये दंड आकारण्याचे पाऊल नियामक तरतुदींचे बँकांनी पालन न केल्यामुळे उचलण्यात आले आहे.