RBI Imposes Penalty On 3 Banks For Irregularities : नियमांचे काटेकोर पालन न केल्यास रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी बँकांवर दंड आकारला जातो. अलीकडेच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या SBI बँकेला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर RBI ने तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. यावेळी आरबीआयने सारस्वत सहकारी बँक लिमिटेड, बसेन कॅथोलिक सहकारी बँक लिमिटेड आणि राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेड यांना दंड ठोठावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सारस्वत सहकारी बँकेला २३ लाखांचा दंड

सारस्वत सहकारी बँकेने बीआर कायद्यातील तरतुदी आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या तरतुदी आणि आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने सारस्वत सहकारी बँक लिमिटेड मुंबईला २३ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला.

हेही वाचाः तरुण राहण्यासाठी ‘या’ अब्जाधीशानं ८०० बिलियन डॉलरला कंपनी विकली, रोज घेतो १११ गोळ्या

‘या’ दोन बँकांनाही दंड ठोठावला

याशिवाय कलम २० च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्रातील वसईमधील बसेन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला २५ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. बसेन कॅथोलिक सहकारी बँक तिच्या मालकीच्या एका संचालक/फर्मला अनेक असुरक्षित कर्जे दिल्याबद्दल दोषी आढळली आहे. रिझर्व्ह बँकेने ‘ठेवीवरील व्याजदर’ यासंदर्भात आरबीआयने जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेडला १३ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

हेही वाचाः “समोसे, मिठाई पार्सलसाठी वर्तमानपत्र वापरू नका”, सणांच्या पार्श्वभूमीवर FSSAI चा दुकानदारांना इशारा!

एसबीआयलाही दंड ठोठावण्यात आला होता

काही दिवसांपूर्वीच आरबीआयने एसबीआय बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांवर दंड ठोठावला आहे. एसबीआयला १.३ कोटी रुपये, इंडियन बँकेला १.६२ कोटी रुपये आणि पंजाब अँड सिंध बँकेला १ कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला होता. केंद्रीय बँक वेळोवेळी नियमांचे उल्लंघन केल्यास बँकांवर दंड आकारते. मात्र त्याचा बँक खातेदारांवर कोणताही परिणाम होत नाही. बँक खातेदारांच्या रोख रक्कम काढण्यावर किंवा जमा करण्यावर कोणतेही निर्बंध लादत नाही.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big action by rbi fines saraswat co operative bank bassein catholic co operative bank rajkot nagarik sahakari bank 3 banks after sbi vrd
Show comments