देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसला मोठा झटका बसला आहे. एका जागतिक कंपनीने तिच्याबरोबरचा १.५ अब्ज डॉलरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती इन्फोसिसने दिली आहे. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये सामंजस्य करारही करण्यात आला होता, मात्र आता मास्टर अॅग्रीमेंट होणार नाही.
सप्टेंबरमध्ये हा करार झाला होता
आयटी सेवा पुरवणारी कंपनी इन्फोसिसने म्हटले आहे की, एका जागतिक कंपनीने त्यांच्याबरोबरचा १.५ अब्ज डॉलरचा बहुवर्षीय करार रद्द केला आहे. १४ सप्टेंबर रोजी Infosys ने Infosys Platform आणि Artificial Intelligence Solutions च्या मदतीने आधुनिकीकरण आणि व्यवसाय ऑपरेशन्स सेवांसह प्रगत डिजिटल अनुभव प्रदान करण्यासाठी या जागतिक कंपनीबरोबर कराराची घोषणा केली होती.
हेही वाचाः रिलायन्स अन् डिस्ने एकत्र येणार? देशातील सर्वात मोठ्या मनोरंजन कंपनीची कमान अंबानींच्या हाती असणार
आयटी कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जागतिक कंपनीने आता सामंजस्य करार रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, दोन्ही पक्ष सर्वसमावेशक कराराचे पालन करणार नाहीत. जागतिक कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्याबाबत दिलेल्या माहितीच्या संदर्भात अद्ययावत माहिती देण्यात आली आहे, अशीही माहिती आयटी कंपनीने दिली आहे.
हेही वाचाः पेटीएमचे वाईट दिवस अद्याप संपलेले नाहीत; १००० कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे शेअर्समध्ये घसरणीची शक्यता
६ महिन्यांत २३ टक्के परतावा
इन्फोसिस शेअरच्या किमतीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. १ महिन्यात शेअर ८ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. ६ महिन्यांत शेअर रिटर्न २३ टक्के होता.