गुरुवारी टेस्ला इंकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. याचा थेट परिणाम कंपनीचे मालक एलॉन मस्क यांच्या एकूण मालमत्तेवर झाला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, ही आतापर्यंतची सातवी सर्वात मोठी घसरण आहे. एलॉन मस्कची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळतेय. याचा परिणाम एलॉन मस्कच्या एकूण मालमत्तेवरही झाला आहे. गेल्या एका दिवसात एलॉन मस्कच्या एकूण संपत्तीत २०.३ अब्ज डॉलरची घट झाली आहे. मालमत्तेत घसरण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे टेस्लाच्या इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होणे आहे. खरं तर टेस्ला इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करीत आहे. अशा परिस्थितीत टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण होऊ शकते.

मस्क आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्यामधील संपत्तीतील दरी शेअर्सच्या घसरणीनंतर आणखी कमी झाली आहे. अर्नॉल्ट हे लक्झरी वस्तू बनवणारी कंपनी LVMH चे अध्यक्ष आहेत. टेस्लाचा हिस्सा घसरल्यानंतरही मस्कची संपत्ती अर्नॉल्टच्या तुलनेत सुमारे ३३ अब्ज डॉलर अधिक आहे.

Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Mumbai ed investigation reveals Mehmood Bhagad is mastermind behind Rs 100 crore Malegaon scam
मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा

हेही वाचाः श्रीलंका ते जपान, भारतीय रुपयाला ‘या’ ५ देशांत अनुकूल चलन दर

केवळ एलॉन मस्कच्या संपत्तीत गेल्या काही दिवसांत घट झालेली नाही. Amazon.com Inc सह ओरॅकल कॉर्पचे जेफ बेझोस, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे लॅरी एलिसन, सीईओ स्टीव्ह बाल्मर, मेटा प्लॅटफॉर्म इंकचे मार्क झुकेरबर्ग आणि अल्फाबेट इंकचे सह संस्थापक लॅरी पेज आणि सेर्गे ब्रिन यांच्या निव्वळ संपत्तीतही घट झाली आहे. या घसरणीचे कारण म्हणजे टेक हेवी Nasdaq-100 चे शेअर्स २.३ टक्क्यांनी घसरले आहेत. गुरुवारी न्यूयॉर्क शेअर बाजारात टेस्लाच्या शेअरने सर्वात मोठी घसरण नोंदवली आहे. ऑस्टिन आधारित टेस्लाचे शेअर्स ९.७ टक्क्यांनी घसरून २६२.९० डॉलरवर आले. ही घसरण २० एप्रिलनंतर सर्वाधिक दिसून आली आहे. कंपनीने घटत्या नफ्याबाबत आधीच इशारा दिला होता.

हेही वाचाः Money Mantra : मुदत विमा आणि जीवन विम्याबद्दल संभ्रम आहे? पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी फरक समजून घ्या

टेस्लाचे शेअर्स का घसरत आहेत?

टेस्लाचे अध्यक्ष मस्क म्हणाले की, व्याजदर असेच वाढत राहिल्यास टेस्लाला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी कराव्या लागतील. अनेक महिन्यांच्या मार्क डाऊनमुळे ऑटोमोटिव्ह ग्रॉस मार्जिनवर आधीच परिणाम झाला आहे, जो दुसऱ्या तिमाहीत चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे.

हेही वाचाः ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूने पशुधन क्षेत्रासाठी “पतहमी योजने”चा प्रारंभ; पतहमी कवच प्रदान करणार

मस्क आणि अर्नॉल्टची निव्वळ संपत्ती किती?

५२ वर्षीय मस्क यांच्या संपत्तीमध्ये टेस्ला स्टेक तसेच स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजी आणि ट्विटर यांचा समावेश आहे. यंदा बुधवारपर्यंत त्यांची संपत्ती सुमारे ११८ अब्ज डॉलरने वाढली होती. तसेच टेस्लाचे शेअर्स १३६ टक्क्यांनी वधारलेत. जगातील दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीवर नजर टाकली तर ७४ वर्षीय अर्नॉल्टची संपत्ती या वर्षात ३९ अब्ज डॉलरनी वाढून २०१.२ अब्ज डॉलर झाली आहे. यासह पॅरिसस्थित LVMH चे शेअर्स २६ टक्क्यांनी वाढले आहेत.

अंबानी आणि अदाणी यांचे रँकिंग काय?

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ११ व्या क्रमांकावर आहेत. यासह अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडचे ​​अध्यक्ष गौतम अदाणी यांचे रँकिंग २२ आहे.

Story img Loader