लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : भांडवली बाजारात खासगी क्षेत्रातील दोन बँकांच्या समभागात मोठे चढ-उतार अनुभवास आले. एकीकडे ॲक्सिस बँकेच्या समभागाने ६ टक्क्यांची उसळी घेतली. तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेची कारवाईचा वार झालेल्या कोटक महिंद्र बँकेच्या समभागाने तब्बल १० टक्क्यांची पडझड अनुभवली.

खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या ॲक्सिस बँकेने बुधवारी नफ्याची कामगिरी जाहीर करण्यासह, समभाग आणि रोख्यांच्या माध्यमातून ५५,००० कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली. परिणामी त्याचे सकारात्मक पडसाद गुरुवारी समभागावर उमटले. समभाग राष्ट्रीय शेअर बाजारात ६ टक्क्यांनी म्हणेजच ६३.७५ रुपयांनी वधारून १,१२७ रुपयांवर बंद झाला. परिणामी बँकेचे बाजार भांडवल १९,६९५.९६ कोटी रुपयांनी वाढून ३,४८,०१४.४५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत ॲक्सिस बँक ही देशातील चौथी सर्वात मूल्यवान बँक ठरली. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत ॲक्सिस बँकेच्या पुढे आहेत.

हेही वाचा >>>Amit Shah Investment: अमित शाह यांच्याकडे कुठल्या कंपनीचे किती शेअर्स आहेत माहीत आहे?

त्या उलट खासगी क्षेत्रातील दुसरी आघाडीची बँक असलेल्या कोटक महिंद्र बँकेच्या समभागात १० टक्क्यांची घसरण झाली. रिझर्व्ह बँकेने कारवाईचा बडगा उगारत या बँकेला ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग माध्यमातून नवीन ग्राहक नोंदवण्यावर तसेच नव्याने क्रेडिट कार्ड वितरित करण्यावर बुधवारी निर्बंध लादले. त्याचे तीव्र पडसाद बँकेच्या समभागावर उमटले. मुंबई शेअर बाजारात समभाग १०.८५ टक्क्यांनी कोसळला, अर्थात २००.०५ रुपयांच्या घसरणीसह १,६४३ रुपयांवर बंद झाला. परिणामी कोटक बँकेचे बाजार भांडवल बुधवारच्या सत्रातील ३.६६ लाख कोटी रुपयांवरून ते ३.२६ लाख कोटींपर्यंत खाली आले.

सरकारी बँका तेजीत

गुरुवारच्या सत्रात सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेचा समभाग ५.१२ टक्क्यांनी वधारला. तो दिवसअखेर ३९.६० रुपयांनी वधारून ८१२ रुपयांवर स्थिरावला. समभागाने प्रथमच ८१४.४० रुपयांच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असून तिचे ७,२५,३०३ कोटींचे बाजार भांडवल आहे. कॅनरा बँकेने देखील ३.३३ टक्क्यांची उसळी घेतली आणि ६१६.८५ रुपयांवर स्थिरावला. त्यापाठोपाठ बँक ऑफ इंडिया ४.०८ टक्के, बँक ऑफ बडोदा ३.६९ टक्के, युनियन बँक १.९५ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्रचा समभाग दीड टक्क्यांनी वधारला.