वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) सरलेल्या मे २०२३ मधील संकलन वार्षिक तुलनेत १२ टक्क्यांनी वाढून १.५७ लाख कोटींवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात या करापोटी १.४१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता, असे अर्थमंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. मात्र मे महिन्यातील जीएसटी संकलन हे आधीच्या एप्रिल महिन्यातील १.८७ लाख कोटी रुपयांपेक्षा खूप कमी राहिले आहे. मात्र आतापर्यंत १४ वेळा ते १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. तर जीएसटीची अंमलबाजवणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाचव्यांदा जीएसटी संकलन हे १.५७ लाख कोटी रुपयांहून अधिक राहिले आहे.

मे २०२३ मध्ये सरकारी तिजोरीत एकूण १,५७,०९० कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा झाला. यंदाच्या या महसुलात, केंद्रीय वस्तू व सेवा करापोटी (सीजीएसटी) २८,४११ कोटी रुपये, राज्य वस्तू व सेवा करापोटी (एसजीएसटी) ३५,८२८ कोटी रुपये, तर एकात्मिक वस्तू व सेवाकरापोटी ८१,३६३ कोटी रुपये (आयात वस्तूंवर गोळा केलेल्या ४१,७७२ कोटी रुपयांसह) आणि ११,४८९ कोटी रुपये उपकरातून (माल आयातीवर जमा झालेल्या १,०५७ कोटी रुपये उपकरासह) गोळा झाले आहेत, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले.

हेही वाचाः GDP वाढीनंतर अर्थव्यवस्थेसाठी आणखी एक चांगली बातमी; उत्पादन क्षेत्र ३१ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
india s industrial production rises 3 1 percent in september
कारखानदारी क्षेत्राचे ऑगस्टमधील उणे स्थितीतून सकारात्मक वळण , सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन दरात ३.१ टक्क्यांची वाढ

मार्च २०२३ मध्ये देशातील जीएसटी संकलन १,६०,१२२ कोटी रुपये होते. गेल्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये जीएसटी संकलन १,६७,५४० कोटी रुपये होते. म्हणजेच गेल्या एप्रिलच्या तुलनेत या एप्रिलमध्ये जीएसटी संकलनात १९,४९५ कोटी रुपये अधिक जमा झाले होते. एप्रिल २०२३ मध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत १२ टक्के जास्त आहे. २० एप्रिल २०२३ रोजी एका दिवसात ९.८ लाख व्यवहार झाले, ज्यामध्ये एका दिवसात ६८,२२८ कोटी रुपयांचा GST जमा झाला आहे, असंही जीएसटी संकलनाचा डेटा जारी करताना वित्त मंत्रालयाने सांगितले होते. यापूर्वी एका दिवसात व्यवहाराचा विक्रम गेल्या वर्षी २० एप्रिल २०२२ रोजी झाला होता, जेव्हा एका दिवसात ९.६ लाख व्यवहार झाले होते, ज्यामध्ये ५७,८४६ कोटी जीएसटी वसुली दिसली होती.

हेही वाचाः आईकिओ लाइटिंगचे भागविक्रीतून ६०७ कोटी उभारण्याचे लक्ष्य; प्रत्येकी २७० ते २८५ किमतीला समभाग विक्रीला