देशात महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. डाळी, तांदूळ, गहू, टोमॅटो, हिरव्या भाज्यांनंतर आता साखर पुन्हा एकदा महाग झाली आहे. गेल्या १५ दिवसांत साखरेच्या किमतीत ३ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी साखरेचे दर ३७,७६० रुपये (४५४.८० डॉलर) प्रति टन पर्यंत वाढले, जे ऑक्टोबर २०१७ नंतरचे सर्वोच्च आहेत. विशेष म्हणजे साखरेच्या किमतीत ३ टक्क्यांनी वाढ झाल्याने गेल्या ६ वर्षांतील उच्चांकी दर गाठला आहे. मात्र, किरकोळ बाजारातील ग्राहकांवर याचा परिणाम होणार नाही.

साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर व्यापारी आणि उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे. व्यापारी आणि उत्पादकांचे म्हणणे आहे की, देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, त्यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. पीक हंगाम २०२३-२४ मध्ये ऊस उत्पादनात घट झाल्यास साखर आणखी महाग होऊ शकते. त्याचबरोबर साखरेच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दर वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ महागणार आहेत.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
Soybean purchase , Soybean rate,
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळूनही दर घसरणीला…
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
Farmers halted auctions in Lasalgaon demanding immediate cancellation of onion export duty
निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
coconut prices increased loksatta news
बदलत्या हवामानामुळे नारळ उत्पादन घटले, श्रीफळ (नारळ) महागले

हेही वाचाः Unclaimed Deposit कमी करणे आवश्यक, बँका अन् वित्तीय संस्थांनी ही पावले उचलावीत : अर्थमंत्री निर्मला सीतारामण

शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळणार

बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, सप्टेंबर महिन्यातही पाऊस पडला नाही, तर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे उसाचे उत्पादन घटू शकते, त्यामुळे साखरेचे भाव आणखी वाढणार आहेत. साखरेच्या दरात वाढ झाल्याने द्वारिकेश शुगर, श्री रेणुका शुगर्स, बलरामपूर चिनी आणि दालमिया भारत शुगर या उत्पादकांचे मार्जिन सुधारेल, असे डीलर्सचे म्हणणे आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देऊ शकतील.

हेही वाचाः Money Mantra : प्राप्तिकर विभागाकडून अलर्ट जारी, ITR रिफंड अद्याप मिळालेला नाही? मग करा ‘हे’ काम

महागाईचा फटका सहन करावा लागणार

१ ऑक्टोबरपासून साखर उत्पादनाचा नवा हंगाम सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत कमी पावसामुळे साखरेचे उत्पादन ३.३ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन ३१.७ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत पोहोचू शकते. अशा स्थितीत सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे.

पुरवठा खंडित झाल्याने किमती वाढतील

अशोक जैन यांच्या म्हणण्यानुसार, साखरेचे दर असेच वाढत राहिले तर केंद्र सरकार तिच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णयही घेऊ शकते. जेणेकरून देशांतर्गत बाजारात त्याच्या किमती कमी करता येतील. साखरेचा साठा कमी होत असल्याने येत्या काही महिन्यांत साखरेचे दर आणखी वाढू शकतात, असे मुंबईतील एका व्यापाऱ्याने सांगितले. तसेच पुढील महिन्यापासून सणासुदीला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत साखरेचा वापर वाढेल. अशा स्थितीत पुरवठा खंडित झाल्याने भाव वाढतील.

Story img Loader