Business Leaders on India-Maldives Controversy: मालदीवचा मुद्दा सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. मालदीव सरकारने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दल अपमानजनक पोस्ट केल्याबद्दल आपल्या तीन मंत्र्यांना निलंबित केले. मालदीवच्या नेत्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भारतातील नावाजलेले व्यापारी अन् उद्योगपतीही चांगलेच संतापले आहेत. अनेक बडे उद्योगपती आणि सीईओ सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे लक्षद्वीपदेखील ट्रेंडिंगमध्ये आहे.
सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनी केली पोस्ट
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ अदर पूनावाला लिहितात, “आपल्या देशात अकल्पनीय क्षमता असलेली अनेक अद्भुत पर्यटन स्थळे आहेत; ज्यांचा अद्याप पूर्ण शोध घेणे बाकी आहे. मी पोस्ट केलेल्या चित्रांवरून तुमच्यापैकी कोणी अंदाज लावू शकेल का? हे भारतीय पर्यटक स्वर्ग कुठे आहे? #ExploreIndianIslands @PMOIndia
एडलवाईस एमएफच्या राधिका गुप्ता यांनीही मालदीवला फटकारलं
एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या एमडी आणि सीईओ म्हणतात, “मी भारतीय पर्यटनाच्या क्षमतेने प्रभावित झाले आहे, त्यामुळे आता लक्षद्वीप आणि अंदमान असताना मालदीवला जाण्यासाठी इतके पैसे का द्यावे?” असा मला प्रश्न पडलाय. उत्तर आहे 1) पायाभूत सुविधा आणि 2) मार्केटिंग… पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यामुळे या ठिकाणाचे आकर्षण निर्माण झाले आहे. आमच्या हॉटेल ब्रँड्सनी आम्हाला वेळोवेळी लक्झरी सुविधा पुरवल्या आहेत. जागतिक दर्जाच्या पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी भारतीय आदरातिथ्याचा फायदा घेऊ यात.”
संताप व्यक्त करत निशांत पिट्टी यांनी बुकिंग केली रद्द
इझ माय ट्रिपचे सीईओ निशांत पिट्टी यांनी पोस्टमध्ये लिहिले, “आमच्या देशाच्या एकजुटीसाठी @EaseMyTrip ने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केल्या आहेत. ✈️ #TravelUpdate #SupportingNation #LakshadweepTourism
ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी EaseMyTrip ने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करत मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केले आहे आणि सोशल मीडियावर देखील याबद्दल माहिती दिली आहे.