भारत आणि बिल गेट्स यांचे संबंध खूप जुने आहेत. बिल गेट्ससुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव भारतात येत आहेत. अलीकडेच त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी नुकत्याच झालेल्या भारत भेटीचा उल्लेख केला आहे. त्यांनी भारताच्या डिजिटल प्रणालीचे कौतुक केले असून, कुसुम नावाच्या मुलीची जगाला ओळख करून दिली. कुसुम बंगळुरू येथील इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या शाखेत काम करते. आपल्या पोस्टमध्ये कुसुमचा उल्लेख करून बिल गेट्स म्हणाले की, ती भारतात खूप चांगले काम करीत आहे आणि भारतात तिच्या समुदायाला डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी काम करीत आहे. बिल गेट्स मलिंदा फाऊंडेशनमध्ये कुसुम आणि भारताच्या डिजिटल प्रणालीचाही उल्लेख करण्यात आला आहे. देशाच्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही त्यांच्या सोशल मीडियावरील ट्विटर अकाउंटवर ही पोस्ट टाकली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिल गेट्स यांनी सांगितली मोठी गोष्ट

बिल गेट्स यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या भारत भेटीदरम्यान मला अशी शक्ती भेटली जी बदलाचे प्रतीक आहे. कुसुम असे या शक्तीचे नाव असून, ती तिच्या स्थानिक टपाल विभागात प्रशंसनीय काम करीत आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, भारत सर्वसमावेशक आर्थिक वाढीला गती देण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात आघाडीवर आहे, कुसुम सारख्या शाखा पोस्टमास्टर्सना स्मार्टफोन उपकरणे आणि बायोमेट्रिक्स वापरण्यास सक्षम बनवून संपूर्ण भारतातील ग्राहकांना बँकिंग सेवा प्रदान करून ती वापरण्यास सक्षम करते. हे केवळ एकात्मिक आर्थिक सेवाच देत नाही तर ते आपल्या समुदायाला आशा आणि आर्थिक सक्षमीकरण देखील बहाल करते.

फाउंडेशनमध्येही नमूद केले कुसुमचे नाव

बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या वेबसाईटवर कुसुम यांच्याशी झालेल्या भेटीबाबत आणि भारताच्या डिजिटल प्रणालीबाबत उल्लेख करण्यात आला आहे. ज्याचे शीर्षक आहे ‘भारतातील डिजिटल बँकिंगची कथा – आणि एका तरुणीच्या करिअरची गोष्ट’. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ७० दशलक्ष लोकांना रोख पैसे काढणे आणि ठेवी, उपयुक्तता पेमेंट यांसारख्या डिजिटल बँकिंग सेवा प्रदान करते. सार्वजनिक क्षेत्र आणि व्यवसाय देशातील कोठूनही सुरक्षितपणे आणि त्वरित पेपरलेस आणि कॅशलेस सेवा प्रदान करू शकतील, यासाठी देश आपली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात पुढे आहे, असंही वेबसाइटवर असे लिहिले आहे. तसेच एका व्हिडीओची लिंकही दिली असून, त्यात बंगळुरूच्या कुसुमबद्दल माहिती देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bill gates liked india digital system and introduced kusum to the world who is kusum vrd
Show comments