मुंबई : बिटकॉइन या आभासी चलनाने मंगळवारच्या सत्रात पुन्हा दोन वर्षांतील उच्चांकी म्हणजे ४५ हजार डॉलरपुढील पातळी गाठली. अमेरिकेत बिटकॉइनवर आधारित ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंडां’ना (ईटीएफ) मंजुरी दिली जाण्याच्या अपेक्षेने त्यांचे मूल्य वधारले.

हेही वाचा >>> निर्मिती क्षेत्राला उतरली कळा; डिसेंबर महिन्यांत दीड वर्षांतील नीचांकी पातळीवर

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
HDFC Bank loan rate hike installment of home loan car loan increase print eco news
एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार काय?

जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य ४५,६८२ अमेरिकी डॉलरवर पोहोचले असून, भारतीय रुपयात सध्या एका बिटकॉइनचे मूल्य सुमारे ३८ लाख ५ हजार रुपये झाले आहे. बिटकॉइनने ६ एप्रिल २०२२ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर झेप घेतली आहे. दुसरे प्रमुख आभासी चलन असलेल्या ईथरच्या मूल्यातदेखील २.६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. अमेरिकी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडून बिटकॉइनवर आधारित ईटीएफला मंजुरी मिळण्याच्या शक्यतेने डिसेंबरपासून बिटकॉइनचे मूल्य २० टक्क्यांनी वधारले आहे. वायदे बाजारात ऑप्शन्स व्यापाऱ्यांनी याच शक्यतेतून बिटकॉइनवर ५० हजार डॉलरच्या पुढे सट्टा लावला होता. जागतिक पातळीवर ‘एफटीएक्स’ हे क्रिप्टो एक्स्चेंज दिवाळखोर झाल्याने गेल्या वर्षींच्या सुरुवातील बिटकॉइनचे मूल्य १६० टक्क्यांनी घसरले होते. तर करोनाकाळात २०२१ मध्ये बिटकॉइनने ६९,००० डॉलरचे मूल्य गाठले होते.