Black Friday sale : ब्लॅक फ्रायडे सेल २४ नोव्हेंबरपासून भारतासह जगभरात सुरू होणार आहे. विशेष म्हणजे सेल सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह कंपन्यांच्या अधिकृत साइटवर चालू होणार आहे. या सेलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घोटाळेबाज आणि सायबर ठग ग्राहकांची फसवणूक करण्याची शक्यता आहे. तुम्हीही ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये सहभागी होण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही टिप्स लक्षात ठेवाव्यात, ज्याद्वारे तुम्ही ऑनलाइन फसवणूक टाळू शकता.
ई-मेलमध्ये मिळालेल्या लिंकवर क्लिक करू नका
आजकाल इंटरनेटचे युग आहे, ज्यामध्ये ई-कॉमर्स साइट्सवरील ऑनलाइन डील आणि विक्रीची माहिती ईमेलद्वारे उपलब्ध आहे. जर तुम्हाला तुमच्या ईमेलमध्ये एखाद्या अपरिचित वेबसाइटची लिंक मिळाली आणि त्यामध्ये तुम्हाला मोठ्या डील किंवा मोठ्या विक्रीची माहिती मिळाली, तर तुम्ही अशा लिंकवर क्लिक करू नये, कारण ती एक प्रकारची फसवणूक असू शकते.
ई-कॉमर्स साइट योग्यरीत्या ओळखा
जेव्हा तुम्ही ई-कॉमर्स साइटवर काही खरेदी करता, तेव्हा तुम्हाला त्यावर चांगले फायदे मिळतात. या माहितीचा फायदा घेण्यासाठी सायबर घोटाळेबाज लोकप्रिय ई-कॉमर्स साइट्सप्रमाणेच बनावट साइट्स विकसित करतात आणि या बनावट साइट्सद्वारे युजर्सची दिशाभूल करून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून जेव्हाही तुम्ही ई-कॉमर्स साइटला भेट देता तेव्हा तुम्ही त्याची सखोल चौकशी करून घ्यावी.
हेही वाचाः बक्षिसाच्या नावाखाली ५ कोटींच्या फसवणुकीचा प्रयत्न; Zerodha चे CEO नितीन कामत ग्राहकांना म्हणाले…
अज्ञात साइटवर बँकिंग तपशील देऊ नका
तुम्ही ऑनलाइन साईटवरून खरेदी करत असल्यास तुमचे बँकिंग तपशील येथे शेअर करू नये. तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केले पाहिजे, जेव्हा तुम्हाला खात्री असेल की ही साइट पूर्णपणे सुरक्षित आहे.