भारतात एकीकडे लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापत असताना दुसरीकडे शेअर बाजारातही तेजी दिसून येत आहे. गुंतवणूकदारांसाठी आज शेअर बाजार मोठा फायदा देऊन बंद झाला. सेन्सेक्सनं आज बाजार बंद होताना तब्बल ४०८.८६ अंकांची उसळी घेतली. त्यामुळे सेन्सेक्स आज ७४,०८५.९९ इतक्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीनंही सेन्सेक्सच्याच पावलावर पाऊल ठेवत गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शेअर बाजार बंद होताना निफ्टीनं तब्बल १२३.६ अंकांची घसघशीत वाढ नोंदवली. त्यामुळे निफ्टीदेखील आत्तापर्यंतची उच्चांकी पातळी गाठताना २२,४७९.९ अंकांवर बंद झाला.

आज टाटा केमिकल्स लिमिटेडचे शेअर्स ११७.१६ ने वाढून ११७८.४५ वर स्थिरावले, तर त्याखालोखाल एक्झिकॉम टेली-सिस्टीम लिमिटेडचे शेअर्स २१.५० ने वाढून २४६.४५ वर स्थिरावले. साईनपोस्ट इंडिया लिमिटेडचे शेअर्सदेखील ३२.११ ने वाढून ४३७.५० वर स्थिरावले. दुसरीकडे महानगर गॅस लिमिटेडचे शेअर्स २३५.८१ ने कोसळून १३२९.६० वर स्थिरावले. तर त्याखालोखाल आयआयएफएल फायनान्स लिमिटेडचे शेअर्स ९५.५६ ने कोसळून ३८२.२० वर स्थिरावले.