कंपनी, बँक आणि विमान कंपनीच्या दिवाळखोरीच्या बातम्या तुम्ही ऐकल्याच असतील. पण शहरं गरीब होतं असल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? होय, जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेले बर्मिंगहॅम हे दिवाळखोर घोषित करण्यात आले आहे. शहराचीही लाखो रुपयांची थकबाकी आहे. या शहरात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. शहरात त्यांना एक वेळेच जेवणाचीही भ्रांत आहे. त्यामुळे आता शहराने आपले सर्व अनावश्यक खर्च थांबवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यूके शहरामध्ये ७६० दशलक्ष पौंड (भारतीय चलनाच्या तुलनेत ९५६ दशलक्ष डॉलर) पर्यंत थकबाकी आहे.

हेही वाचाः काय सांगता! आता UPIच्या मदतीने काढता येणार ATM मधून पैसे, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला VIDEO

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

या खर्चावर बंदी घातली

CNN च्या रिपोर्टनुसार, बर्मिंगहॅम सिटी कौन्सिल जे सध्या १० लाखांहून अधिक लोकांना सेवा प्रदान करते, यांनी मंगळवारी दिवाळखोरीची माहिती दिली. त्यानंतर शहरात फक्त आवश्यक खर्चाची परवानगी आहे. सर्व प्रकारच्या अनावश्यक खर्चावर बंदी घालण्यात आली आहे. शहराची परिस्थिती गंभीर आहे, कारण त्याला “समान वेतन दायित्वा”साठी निधी द्यायचा आहे, जो आतापर्यंत GBP ६५० दशलक्ष ते GBP ७६० दशलक्षापर्यंत जमा झाला आहे, परंतु तसे करण्यासाठी निधी नाही. यासाठी कोणतीही संसाधने नाहीत. एवढेच नाही तर २०२३-२४ या वर्षात शहराला ८.७ दशलक्ष पौंडांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः २२० सभा, ६० शहरे अन् १५ दशलक्ष लोक, अशा प्रकारे जी २० देशाची अर्थव्यवस्था बदलणार

थॉम्पसन यांनी यूके सरकारलाही जबाबदार धरले

परिषदेचे उपनेते शेरॉन थॉम्पसन यांनीही शहरातील या परिस्थितीसाठी ब्रिटनच्या सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला अंशतः जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, बर्मिंगहॅममध्ये ‘कंझर्व्हेटिव्ह सरकारांकडून १ बिलियन पाऊंड निधी काढून घेण्यात आला’. विशेष म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शहरातील सर्व अनावश्यक खर्चावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही शहरातील व्यवसाय सुरू असून, बाजारपेठा व्यापारी लोकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.