देशातील सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी BSNL च्या वतीने देशभरात 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी टाटा समूहाची तंत्रज्ञान कंपनी असलेल्या TCS ला १५,००० कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे. टीसीएसने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत हे सांगितलं आहे. टीसीएसच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमला ​​सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी बीएसएनएलने १५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची आगाऊ खरेदी ऑर्डर दिली आहे. हे देशभरात 4G नेटवर्क उभारण्याबाबत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

4G बाबत BSNL ची योजना काय?

सरकारी टेलिकॉम कंपनी 4G सेवा जोरात सुरू करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी दळणवळण राज्यमंत्री देवसिंह चौहान यांनी सांगितले होते की, सरकारने एक लाख बीएसएनएल 4जी टॉवर उभारण्यास मंजुरी दिली आहे. कामाला सुरुवात झाली असून, विविध ठिकाणांची ओळख पटली आहे. सरकार लवकरात लवकर 4G आणण्यासाठी काम करीत आहे.

BSNL 4G मध्ये उशीर का होतोय?

BSNL वापरकर्ते हे खूप दिवसांपासून 4G ची वाट पाहत आहेत. या विलंबामागे अनेक कारणे दिली जात आहेत. BSNS च्या 4G नेटवर्कमध्ये पूर्णपणे स्वदेशी उपकरणे वापरली जातील. त्याच्या उशिरा येण्याचे हेही एक प्रमुख कारण आहे.

BSNL 4G च्या माध्यमातून कंपनीचा मार्केट शेअर वाढेल का?

BSNL आपल्या 4G नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी सुमारे ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. येत्या तीन वर्षांत बाजारातील हिस्सा दुप्पट करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि एमडी प्रवीण कुमार पुरवार यांनी सांगितले की, कंपनीने आपला बाजार हिस्सा १५ ते २० टक्क्यांनी वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsnl orders over rs 15000 crore to tcs in preparation for setting up 4g network vrd
Show comments