Haldiram-Bikaji History: गेल्या काही दिवसांपासून हल्दिरामचे नाव चर्चेत आहे. टाटा समूह आणि हल्दिराम यांच्यात करारासाठी चर्चा सुरू असल्याच्या बातम्या या आठवड्यात आल्या होत्या. तसेच टाटा समूह हल्दिरामच्या स्नॅक्स ब्रँडमधील ५१ टक्के हिस्सा विकत घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचीही अटकळ बांधली जात होती. त्यानंतर टाटा समूह आणि हल्दिराम या दोघांनीही अशा बातम्यांचे खंडन केले असले तरी त्यानंतरही हल्दिराम प्रसिद्धीच्या झोतात आहे. टाटा आणि हल्दिरामच्या बातम्यांमध्ये तिसरे नावही चर्चेत आहे आणि ते म्हणजे बीकाजीचे. टाटा आणि हल्दिराम यांच्यातील कराराची बातमी आली आणि बीकाजी फूड्सचे शेअर्स वाढू लागले.
या दोन मोठ्या ब्रँडचे कनेक्शन
वास्तविक हल्दिराम आणि बीकाजी यांचा संबंध अपघाती नाही. हल्दिराम आणि बीकाजी हे सध्या भारतातील दोन सर्वात मोठे स्नॅक्स ब्रँड आहेत. या दोन्ही ब्रँडचा या मार्केटमध्ये बराच दबदबा आहे. हे दोन्ही ब्रँड स्वबळावर आणि एकट्याने पेप्सिकोसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना समान स्पर्धा करतात, यावरून या वर्चस्वाचा अंदाज लावता येतो. त्यांची लोकप्रियता इतकी आहे की, प्रत्येक मूल त्यांच्या स्नॅक्सचे चाहते आहे. लोकांच्या घरी पाहुणे येतात, तेव्हा त्यांना मिठाईसह हल्दिराम किंवा बीकाजीचा फराळ दिला जातो. म्हणजे हल्दिराम आणि बीकाजी हे दोघेही असे ब्रँड आहेत, जे भारतातील जवळपास प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेले आहेत.
हेही वाचाः आधार कार्ड अपडेटची तारीख पुन्हा वाढवली, आता तुम्ही ‘या’ तारखेपर्यंत लाभ घेऊ शकता
स्वातंत्र्यापूर्वी १९३७ साली ब्रँड सुरू झाला
गंमत म्हणजे दोघांचे नाते खूप जुने आणि खोल आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास दोन्ही ब्रँडची मुळे एकच आहेत, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ही कथा अनेक वर्षांपूर्वी म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी १९३७ साली सुरू झाली. राजस्थानच्या बिकानेर शहरात एक छोटंसं दुकान होतं, जे स्नॅक्ससाठी प्रसिद्ध होत होतं. दुकान कशामुळे खास बनले आणि ज्यामुळे बिकानेरच्या लोकांना ते खूप आवडू लागले, ते म्हणजे या दुकानात घरगुती फराळ विकला जात होता. विशेषतः बिकानेरी आलू भुजिया विकल्या जायच्या.
हेही वाचाः ”मोदींनी ५० वर्षांचे काम ६ वर्षांत करून दाखवले”, जी २० परिषदेपूर्वीच जागतिक बँकेकडून भारताची प्रशंसा
अशा प्रकारे हल्दिराम नावाचा ब्रँड तयार झाला
गंगाभीषण अग्रवाल असे दुकानदाराचे नाव होतो. गंगाभीषण अग्रवाल यांना लोक हल्दिराम नावाने ओळखत होते. अशा प्रकारे बिकानेरचे लोक त्या दुकानाला हल्दिराम भुजिया वाले या नावाने ओळखू लागले. कालांतराने हल्दिराम ब्रँडची सुरुवात झाली. हल्दिराम अग्रवाल यांच्या नंतरच्या पिढ्यांनी हा ब्रँड केवळ चांगलाच हाताळला नाही तर तो एक मोठा व्यवसाय बनवला. हलिदीरामची दिल्ली शाखा १९८२ मध्ये सुरू झाली, जी अजूनही दिल्लीच्या मध्यभागी म्हणजेच कॅनॉट प्लेसमधील एक प्रतिष्ठित ठिकाण आहे.
जेव्हा तिसर्या पिढीच्या हाती सूत्रे जाताच हल्दिराम विभक्त झाला
तिसऱ्या पिढीत हल्दिरामचा व्यवसाय विभागला गेला. त्यानंतर त्यांचा नातू शिव रतन अग्रवाल वेगळे झाले आणि १९९३ मध्ये बिकाजी नावाचा स्वतःचा ब्रँड सुरू केला. सध्या हल्दिरामचे कुटुंब अनेक कंपन्या चालवत आहे. जसे दिल्लीचे हल्दिराम वेगळे आणि नागपूरचे हल्दिराम वेगळे आहे. हल्दिराम आणि बिकाजी हे दोन्ही ब्रँड आता फक्त आलू भुजियापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये देशातील अनेक शहरांमधील विविध प्रकारचे स्नॅक्स आणि रेस्टॉरंट्सचा समावेश आहे.
बीकाजीचे बाजारमूल्य किती?
बीकाजी ब्रँडने तर शेअर बाजारात प्रवेश केला आहे. बीकाजी ब्रँड चालवणारी कंपनी बीकाजी फूड्सने गेल्या वर्षी आयपीओ आणला होता. बीकाजी फूड्सच्या आयपीओचा आकार ८८१ कोटी रुपये होता आणि त्याला बाजारात गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. बीकाजी फूड्स IPO ची किंमत १८५-३०० रुपये होती. आज त्याचा हिस्सा ५३० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. अशा प्रकारे हा बाजाराचा मल्टिबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे आणि सुमारे ९ महिन्यांत ७० टक्क्यांपर्यंत शेअर्स वाढले आहेत. कंपनीचे बाजारमूल्य सध्या १३,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
हल्दिरामचा मार्केट शेअर किती?
हल्दिरामबद्दल सांगायचे झाल्यास या ब्रँडच्या नावाने व्यवसाय करणाऱ्या तीन भावांनी गेल्या वर्षी एकमेकांमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी CNBC TV-18 ने एका अहवालात सांगितले होते की, विलीनीकरणानंतर तीन भावांनी IPO लाँच करण्याची योजना आखली आहे. युरोमॉनिटर इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, भारताच्या ६.२ अब्ज डॉलरच्या स्नॅक्स मार्केटमध्ये हल्दिरामचा वाटा १३ टक्के आहे. भारतीय स्नॅक्स मार्केटमध्ये पेप्सिकोचा वाटाही जवळपास १३ टक्के आहे.