नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तंत्रज्ञानाधारित ऑनलाइन शिकवणी मंच असलेल्या ‘बैजूज’ विरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) दिवाळखोरीसाठी याचिका मंगळवारी दाखल केली आहे. त्याला आव्हान देण्याची ‘बैजूज’ने बुधवारी घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील बोधचिन्हासाठी ‘बैजूज’ने प्रायोजकत्व दिले होते. त्या प्रायोजकत्वाचे थकलेले १५८ कोटी रुपये देण्यात अपयशी ठरल्याने बीसीसीआयने एनसीएलटीकडे धाव घेतली. १६ जुलै रोजी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना एनसीएलटीने ‘बैजूज’ची पालक कंपनी थिंक अँड लर्नची दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीने बाजारात उडवली खळबळ; मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…

न्यायाधिकरणाने पंकज श्रीवास्तव यांना अंतरिम रिझोल्युशन प्रोफेशनल (आयआरपी) म्हणून कंपनीला चालवण्याचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. शिवाय एनसीएलटीने हा वाद लवादाकडे वर्ग करण्याची ‘बैजूज’ची विनंतीही फेटाळून लावली. शिवाय, कंपनी दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेच्याअंतर्गत ‘बैजूज’ला कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करण्यालाही प्रतिबंध करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> जिओ, एअरटेलच्या ग्राहकसंख्येत मे महिन्यात ३४ लाखांची भर; ग्राहकसंख्येत जिओ, एअरटेलची बाजी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या याचिकेला ‘बैजूज’ आव्हान देण्याची तयारी करत असली तरी दुसरीकडे नरमाईची भूमिका घेत चर्चेची तयारीही दर्शवत, संभाव्य दिवाळखोरी प्रक्रिया रोखण्याचा तिचा प्रयत्न आहे. मात्र ‘बैजूज’कडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया अधिकृतपणे आलेली नाही. अलीकडच्या वर्षांत ‘बैजूज’ला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. चालू महिन्यात ‘बैजूज’ने हक्कभाग विक्रीद्वारे उभारलेल्या निधीतून कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे अन्यथा लेखापरीक्षणास सामोरे जावे, असा इशारादेखील एनसीएलटीने दिला होता. याचबरोबर ‘बैजूज’चे परदेशी गुंतवणूकदार आणि संस्थापक रवींद्रन बैजू यांच्यातील वाद शिगेला पोहोचला असून परदेशी गुंतवणूकदार त्यांची हकालपट्टी करू इच्छित आहेत. ‘बैजूज’चे संस्थापक बैजू रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गैरव्यवस्थापन आणि अपयशाचे खापर फोडण्यात आले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Byju s ready to face bcci bankruptcy claim print eco news zws