गेल्या काही दिवसांपासून एडटेक स्टार्टअप बायजू मोठ्या संकटात सापडलं आहे. कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकले जात गेले आहे, तर त्याचदरम्यान दुसरीकडे बायजूचे संस्थापक दुबईतील गुंतवणूकदारांना स्पष्टीकरण देत होते.विशेष म्हणजे गुंतवणूकदारांशी संवाद साधत असताना रवींद्रन यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी स्वत:ला निर्दोष असल्याचं सिद्ध केलं. एप्रिलच्या उत्तरार्धात साध्या वेशातील भारतीय अधिकार्यांनी बायजूच्या बंगळुरू कार्यालयावर छापे टाकून लॅपटॉप जप्त केले होते. त्या काळात जगातील सर्वात प्रसिद्ध एडटेक स्टार्टअपवर परकीय चलनाच्या संभाव्य हेराफेरीचा आरोपही करण्यात आला होता.
गुंतवणूकदारांसमोर कंपनीची बाजू मांडताना रवींद्रन रडले
बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन हे दुबईत गुंतवणूकदारांचे फोन कॉल्सवर अटेंड करत होते, जेव्हा सरकारी एजन्सीने बायजूच्या कार्यालयांवर छापे टाकले. या बैठकीला उपस्थित असलेल्यांच्या मते, पश्चिम आशियातील गुंतवणूकदारांकडून १ अब्ज डॉलर इक्विटी फंड उभारण्याची योजना अजूनही अडचणीत होती आणि गुंतवणूकदारांसमोर आपल्या कंपनीचा बचाव करताना रवींद्रन यांना अश्रू अनावर झाले.
हेही वाचाः टाटा मोटर्सची मोठी घोषणा, कंपनी DVR शेअर्सचे सामान्य शेअर्समध्ये रूपांतर करणार, तुम्हाला काय फायदा?
एडटेक स्टार्टअप बायजू अनेक महिन्यांपासून आव्हानांना तोंड देतायत
बायजूचे संस्थापक रवींद्रन अनेक महिन्यांपासून संकटात आहेत. भारताच्या आर्थिक गुन्हेगारी एजन्सीच्या छाप्यांव्यतिरिक्त त्यांच्या शिकवणी स्टार्टअप्सपैकी एक त्याच्या आर्थिक खात्यांचे रिटर्न वेळेवर भरण्यात अयशस्वी ठरले. अनेक यूएसस्थित गुंतवणूकदारांनी बायजूवर अर्धा अब्ज डॉलर्स लपवल्याचा आरोप केला, त्यानंतर खटलेही दाखल झालेत.
हेही वाचाः आतापर्यंत २००० रुपयांच्या किती नोटा परत आल्या? सरकारने संसदेत दिली मोठी माहिती
लॉकडाऊननंतर जेव्हा वर्ग सुरू झाले तेव्हा बायजूची आर्थिक स्थिती ढासळू लागली
पण जेव्हा लॉकडाऊननंतर वर्ग पुन्हा सुरू झाले, तेव्हा बायजूची आर्थिक स्थिती ढासळू लागली. दरम्यान, गुंतवणूकदारांनी प्रश्न केला की, रवींद्रनने मुख्य वित्तीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास अनेक वर्षांपासून विलंब का केला आणि तसेच जगभरातील डझनहून अधिक कंपन्या विकत घेण्याचा प्रयत्न कशासाठी केला. बायजूमधील अनेक कर्मचारी एकतर सोडून गेले आहेत किंवा त्यांना काढून टाकण्यात आले आहे. मंडळाच्या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत आणि अनेक शिक्षण केंद्रे जवळपास बंद आहेत.
बायजू यांच्या नेतृत्वावर निष्काळजीपणाचा आरोप
विशेष म्हणजे रवींद्रन यांचे समर्थकच एका अननुभवी संस्थापकाच्या उत्साह आणि साधेपणामुळे ही वेळ आल्याचं सांगतात. समीक्षकांचे म्हणणे आहे की, त्यांनी आर्थिक माहिती लपवून काटेकोरपणे खात्यांचे ऑडिट करण्यात बेपर्वाई केली. परंतु रवींद्रन आणि BYJU च्या प्रवक्त्याने गुंतवणूकदारांच्या संवादादरम्यान झालेल्या घटनेवर भाष्य करण्यास नकार दिला.